एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा

By Admin | Updated: October 3, 2015 03:20 IST2015-10-03T03:20:36+5:302015-10-03T03:20:36+5:30

शनिवार आणि रविवारला जोडून गांधी जयंतीची सुट्टी आल्याने विकेन्ड साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याकडे जाणाऱ्या

Vehicle Range at Expressway | एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा

एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा

खालापूर : शनिवार आणि रविवारला जोडून गांधी जयंतीची सुट्टी आल्याने विकेन्ड साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर शुक्र वारी सकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकाच वेळी हजारो हलकी वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र एक्सप्रेसवेवर होते. महामार्ग पोलीस वाहन चालकांना सुचना करत असले तरी खालापूर टोलनाका ते दस्तुरी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
शुक्र वारी गांधी जयंती असल्याने शासकीय सुट्टी होती. त्यानंतर शनिवार व रविवारचा विकेन्ड असल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर त्यामुळे शुक्र वारी सकाळपासूनच वाहनांची गर्दी होती. सकाळी १० नंतर गर्दीमध्ये आणखी वाढ झाली. खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबईतून पुण्याला जाण्यासाठी एकाच वेळी हजारो वाहने रस्त्यावर आल्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची अधिक गर्दी होती. महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. त्याचवेळेस अमृतांजन ब्रीज जवळ रस्त्यावर एक ट्रेलर आडवा आल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. (वार्ताहर)

Web Title: Vehicle Range at Expressway