शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या ‘एक्स्प्रेस’ रांगा

By admin | Updated: July 26, 2015 02:32 IST

आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे.

खालापूर : आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याने संतापाचे वातावरण आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर धोकादायक दरडी हटविण्याचे काम शुक्र वारपासून सुरू करण्यात आले. काम सुरू असताना एक्स्प्रेस-वे बंद ठेवण्यात आला असून एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक जुन्या मार्गाने वळविण्यात आली आहे. यामुळे जुन्या मार्गावर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अनेक तास अडकून राहावे लागले. त्यामुळे लहान मुले, वृद्ध व महिला यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. खालापूर टोलनाका ते सायमाळ या दरम्यान अनेक वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. खोपोली शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. काम सुरू असताना अडथळा येऊ नये म्हणून बोरघाटापासून खालापूर टोलनाक्यापर्यंतची वाहतूक जुन्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. (वार्ताहर)आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढल्या जात असल्याने एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक बंद ठेवून जुन्या मार्गाने वळविण्यात आली आहे. जुन्या मार्गाची क्षमता नसतानाही वाहतूक सुरू राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र हा मार्ग अतिशय अरुंद असल्याने गेले दोन दिवस प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. प्रवाशी व स्थानिकांची दोन दिवस गैरसोय झाली असून वाहतूक कोंडीवर उपाय काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.- समाधान पवार, पोलीस अधीक्षक वाहतूक विभाग