शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना भाजीपाला व्यवस्थापनाचे धडे!

By admin | Updated: September 21, 2015 01:03 IST

पारंपरिक पिकासोबतच शेतकरी नवे पीक प्रयोग करीत असून, वेगवेगळ््या पिकांचे प्रशिक्षण घेण्यास उत्सुक आहेत. यासाठीच कृषी विद्यापीठांनी

अकोला : पारंपरिक पिकासोबतच शेतकरी नवे पीक प्रयोग करीत असून, वेगवेगळ््या पिकांचे प्रशिक्षण घेण्यास उत्सुक आहेत. यासाठीच कृषी विद्यापीठांनी वेगवेगळ््या पिकांचे व्यवस्थापन व पेरणीतंत्राचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. शासनाने या प्रशिक्षण प्रकल्पाला राबविण्यासाठी मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने भाजीपाला पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येत आहे.शेतकऱ्यांची मागणी व गरज लक्षात घेऊन साकोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांना भाजीपाला पीक व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. भाजीपाला, वांगे, टोमॅटो, काकडी, कारले, दोडकी, चवळी, मिरची, भेंडी, या अनेक भाजीवर्गीय पिकांची बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, ओलित, तण व्यवस्थापन कसे करावे, यासाठी शेतकऱ्यांचे वर्ग घेतले जात आहेत. भाजीपाला पिकावर विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्या किडीची ओळख, किडींचा जीवनक्रम आणि नियंत्रणाचे उपाय, या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पीके घ्यावीत, यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, सेंद्रिय भाजीपाला व पीक संरक्षण कसे करावे, हे समजावून सांगितले जात आहे. शासनाने शेती व उद्यानविद्या शेतकरी प्रशिक्षण प्रकल्प डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला दिला आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर विविध पिकांचे बीजोेत्पादन करण्यास सुरुवात केली आहे.