शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव पेटले : ट्रकसह दुकान जाळले

By admin | Updated: June 1, 2014 00:39 IST

धार्मिक गाणे वाजवण्यासह एका गुन्'ातील आरोपीला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने येथील एका फळाच्या दुकानाला आग लावत ट्रकही पेटवला़ अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली

 मारहाणीचे निमित्त : अनेक घरांवर दगडफेक : १० जण जखमी

 वरणगाव (जि. जळगाव) : धार्मिक गाणे वाजवण्यासह एका गुन्'ातील आरोपीला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने येथील एका फळाच्या दुकानाला आग लावत ट्रकही पेटवला़ अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली असून सुमारे १० जण जखमी झाले आहेत़ शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या दंगलीने गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची पळापळ झाली तर व्यापारी पेठेतही दुकाने बंद करण्यासाठी धावपळ उडाली़ एका राजकीय पुढार्‍याचे दंगलीत मारहाण झालेल्या जखमीशी पूर्ववैमनस्य असल्याने व त्यातून दंगल घडल्याचा संशय व्यक्त होत आहे़ मारहाणीनंतर दंगलीला सुरुवात सुमारे दोन महिन्यांपूर्वी वरणगावमार्गे कत्तलीच्या इराद्याने जाणारा ट्रक हिंदुत्वादी संघटनेचा कार्यकर्ता गणेश आत्माराम धनगर (३२) याने अडवला होता. त्यावेळी वादही झाला होता. या प्रकरणी वरणगाव पोलिसांनी गणेशविरुद्ध भादंवि १४३ अन्वये गुन्हा दाखल केला होता़ तेव्हापासून तो पसार होता़ आरोपी बाहेर निघताच हल्ला शनिवारी गणेश सिद्धेश्वरनगरातून वरणगावकडे येत असताना पुलाजवळ अज्ञात इसमांनी त्याच्या अंगावर चादर टाकत डोक्यात रॉडने जबर दुखापत केलीतर छाती-पोटावर ब्लेडने वार केल्याने तो जागीच बेशुद्ध पडला़ रात्री आठ वाजता ही घटना घडली़ त्यानंतर आरोपी पसार झाले मात्र जखमीच्या समर्थकांना ही बाब कळताच त्यांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात आणले़ हल्ल्याची माहिती मिळताच शेकडो लोकांचा जमाव वरणगाव पोालीस स्टेशनभोवती जमा झाला़ पोलिसांचा गाफिलपणा नडला पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून पांगवून तात्पुरता शांतता निर्माण केली खरी मात्र हा जमाव नेमका पुढे जातो कुठे व करतो काय? याची खबरदारी न घेतल्याने दंगल अधिक भडकल्याचा आरोप आहे़ दुकानाला आग, ट्रकही पेटवला संतप्त जमावाने बसस्थानक चौकाकडे मोर्चा वळवत काही दुकानांवर दगडफेक केली़ सुभान पिंजारी यांच्या फळांच्या दुकानाला आग लावण्यात आल्याने लाखोंचे नुकसान झाले तर राष्ट्रीय महामार्गावरील मंगल ढाब्याजवळ उभ्या असलेल्या कलीमुद्दीन यांच्या मालकीच्या ट्रकला आगही लावण्यात आली़ घरांवर भिरकावले दगड, १० जखमी दरम्यान, धनगरवाड्यासह अनेक घरांवर जमावाकडून दगड भिरकावण्यात आले यात सुमारे १० ते १५ जण जखमी झाल्याचा अंदाज आहे़ दंगलीनंतर गावात तणावपूर्व शांतता पसरली असून जिल्'ावरून रात्री उशिरापर्यंत कुमक दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़