शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने युपीएचा पराभव

By admin | Updated: May 30, 2014 01:02 IST

केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती. त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला पराभव झाला, असे मत

मणिशंकर अय्यर  : आरोपावर वेळीच स्पष्टीकरण झाले नाहीनागपूर : केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती.   त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला  पराभव झाला, असे मत माजी केंद्रीय मंत्री खा. मणिशंकर अय्यर यांनी गुरुवारी व्यक्त केले. प्रदेश  काँग्रेसचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रामटेक येथे  आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, देशमुख यांच्या निवासस्थानी पत्रपरिषदेत ते बोलत होते.युपीए सरकारने मनरेगा, राष्ट्रीय पेयजल, इंदिरा आवास, अन्नसुरक्षा अशा रचनात्मक योजना हाती  घेतल्या. विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात या योजना केंद्र शासनाने राबविल्याचा प्रचार  करण्यात आम्ही कमी पडलो. काँग्रेसच नव्हे तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, अकाली  लोकदल व नॅशनल कॉन्फरन्स अशा पक्षांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.  पक्षाच्या नेत्या  सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यामुळे किमान ४४ जागा तरी मिळाल्या नाही तर इतक्याही जागा  मिळाल्या नसत्या, असे अय्यर म्हणाले. पक्षाने उमेदवारांची नावे सहा महिन्यापूर्वीच जाहीर  करायला हवी होती. काही उमेदवारांची नावे उमेदवारी अर्ज भरण्याला काही तासाचा अवधी  शिल्लक असताना जाहीर करण्यात आली. घोटाळे झाले नसतानाही याचे वेळीच स्पष्टीकरण दिले  नाही. ज्यांना कोळशाचे कंत्राट मिळाले त्यात विरोधी पक्षाचेच लोक होते. मोदी सरकारचा देशाला  धोका असून आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही अनेकदा  काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे  यातून पक्ष लवकरच सावरेल, असा विश्‍वास अय्यर यांनी व्यक्त  केला. यावेळी रणजित देशमुख व डॉ. अमोल देशमुख उपस्थित होते.एसआयटीने निवडणूक खर्चाचाही शोध घ्यावाकाळ्यय़ा पैशाचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने भाजपने निवडणुकीत  केलेल्या हजारो कोटींच्या खर्चाचाही शोध घ्यावा. (प्रतिनिधी) त्यांना परदेशातील बँकामध्ये ठेवलेल्या काळ्या पैशाचा शोध घेण्याची गरज भासणार नसल्याचे  मणिशंकर अय्यर म्हणाले. (प्रतिनिधी)