शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 06:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कठोर निर्बंधांमुळे राज्यातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांतील सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कठोर निर्बंधांमुळे राज्यातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांतील सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी केली आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही देतानाच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्याचे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले.राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, सध्या ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा सुरू होत्या. मात्र, आता कठोर निर्बंधामुळे ऑफलाइन परीक्षा शक्य होणार नाहीत. त्यामुळे आता उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला असून ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठांनी तातडीने यंत्रणा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी १५ दिवसांत पुन्हा कुलगुरूंसोबत बैठक घेतली जाईल, असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळे निकाल लवकर लागेल. राज्यातील ३७ लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा विभागाचा मानस आहे. १८ ते २५ या वयोगटातील हे विद्यार्थी असल्याने त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. शिवाय, लसीकरणासाठी एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेता येईल का, याबाबत संबंधित उपक्रमांच्या प्रमुखांशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

प्राध्यापक भरती होणारnविधि विभागाच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. प्राध्यापक भरती बाबतही चर्चा झाली आहे. nही भरती करणार आहोत. फक्त कोविड संकट कमी झाल्यावर ती होईल, प्राध्यापक भरती होणार नाही, अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUday Samantउदय सामंत