केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 22:26 IST2025-10-04T22:25:32+5:302025-10-04T22:26:11+5:30
Amit Shah Arrives In Shirdi केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
शिर्डी - केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही श्री. शाह यांचे स्वागत केले. याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.