बनावट संकेतस्थळावरुन बेरोजगारांना गंडा, तिघे ताब्यात

By Admin | Updated: January 7, 2017 23:36 IST2017-01-07T23:36:37+5:302017-01-07T23:36:37+5:30

आदिवासी विकास विभागात विविध रिक्त पदे भरावयाची आहेत, अशी जाहीरात बनावट संकेतस्थळावरून प्रसिध्द करून बेरोजगारांची फसवणूक करणा-या तीन

Unemployed people from fake website, hold three | बनावट संकेतस्थळावरुन बेरोजगारांना गंडा, तिघे ताब्यात

बनावट संकेतस्थळावरुन बेरोजगारांना गंडा, तिघे ताब्यात

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 07 -  आदिवासी विकास विभागात विविध रिक्त पदे भरावयाची आहेत, अशी जाहीरात बनावट संकेतस्थळावरून प्रसिध्द करून बेरोजगारांची फसवणूक करणा-या तीन संशयितांना जळगाव व धूळे येथून नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, जळगावमधील तुकाराम पवार उर्फ बापू, धुळे येथील हेमंत पाटील, पप्पू उर्फ सुरेश पाटील, या तीघा भामट्यांच्या मुसक्या शनिवारी (दि.७) पोलिसांनी आवळल्या. या गुन्ह्यात एकूण दहापेक्षा अधिक  संशयित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आदिवासी विकास विभागात नोकरभरतीची बनावट जाहिरात बनावट संकेतस्थळ तयार करुन आॅनलाइन प्रसिध्द केली. या जाहिरातीवरून विविध रिक्त पदांची माहिती देत या भामट्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तिघा भामट्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत एका तक्रारदाराने मुंबई नाका पोलीस ठाण्यात काही दिवसांपुर्वी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाकडून तपास चक्रे फिरविली. हे तीघे संशयित एका स्वीफ्ट मोटारीने जात असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाठलाग करुन गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीसह त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Unemployed people from fake website, hold three