शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

बेशुद्धावस्थेतच घेतली पत्नीची तलाकनाम्यावर सही

By admin | Updated: October 1, 2014 00:49 IST

खसमगाव येथील प्रकार, दुसरी मुलगी झाल्याने पतीची नाराजी.

अनिल गवई/खामगावदुसरी मुलगी जन्मली म्हणून तिचा जन्म झाला त्यादिवशीच, पत्नीची बेशुद्धावस्थेत तलाकनाम्यावर सही घेतल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ही दुर्दैवी महिला खामगावची असून, आधुनिक युगातही लिंगभेद काहींच्या मनात खोलवर रूजला असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. खामगाव शहरातील ताज नगर भागातील शबाना (काल्पनिक नाव) हिचा विवाह राजस्थानातील एका युवकाशी झाला होता. तिला पहिली मुलगी झाली आणि सासरकडील मंडळीच्या वागणुकीत कमालीचा बदल झाला. मुलगी जन्माला आल्यामुळे सासरकडील मंडळीने तिला हिणवण्यास सुरूवात केली. दरम्यान, मुलीचा संसार टिकावा म्हणून शबानाचे सावत्र वडिल आणि आईने सासरकडील मंडळीची समजूत घातली. स्वत:जवळ जमा असलेले थोडेफार पैसे सासरच्या मंडळीला दिले. त्यानंतर काही दिवस शबानाचा संसार व्यवस्थित चालला; मात्र तिला दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर परिस्थिती बिघडली. दुसर्‍या मुलीमुळे भ्रमनिरास झालेल्या शबानाच्या पतीने मुलीच्या जन्माच्या दिवशीच दवाखान्याच्या कामाचे निमित्त करून शबानाची एका कागदावर सही घेतली. त्यावेळी शबाना जवळपास बेशुद्धावस्थेत होती. वास्तविक पतीने तिची सही घेतलेला तो कागद म्हणजे तलाकनामा होता. त्यानंतर त्याने शबानाच्या माहेरच्या मंडळीना बोलावून घेतले. त्यानुसार शबानाची आई आणि सावत्र वडिल राजस्थानला गेले. बाळ -बाळांतिनला घेवून त्यांनी खामगाव गाठले. मुलीला माहेरी नेण्यासाठी काही पैसेही सासरकडील मंडळीनी शबानाच्या आईकडे दिले. शबाना आपल्या दोन्ही मुलींसह खामगावात आल्यानंतर दोन दिवसांनी, पतीचा फोन आला. पतीचे म्हणणे ऐकून तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने आपल्या १२ दिवसांच्या चिमुकलीसह थेट पोलिस स्टेशन गाठून, विश्‍वासघाताने आपली तलाकनाम्यावर सही घेतल्याचे पोलिसांना सांगितले. खामगाव पोलिसांनी हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्राकडे सुपूर्द केले असून, तलाकनाम्यावर सही केल्याने आता शबानाला कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केल्यानंतरच न्याय मिळणे शक्य होणार आहे. येथील महिला तक्रार निवारण केंद्राच्या समुपदेशक स्वाती इंगळे यांनी बेशुद्धावस्थेत तलाकनाम्यावर सही घेतल्याचे एक प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्राकडे आले असल्याचे सांगीतले. दुसरी मुलगी जन्माला आल्याने घटस्फोट देण्यात आल्याचे तक्रारकर्त्या महिलेचे म्हणणे असल्याचे सांगीतले.