शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मनोमिलन, राज्यात युतीचेच सरकार

By admin | Updated: December 4, 2014 14:07 IST

विधानसभा निवडणुकीत दुभंगलेल्या शिवसेना- भाजपा युतीचे अखेर मनोमिलन झाले आहे. गुरुवारी शिवसेना - भाजपाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - विधानसभा निवडणुकीत दुभंगलेल्या शिवसेना - भाजपा युतीचे अखेर मनोमिलन झाले आहे. गुरुवारी शिवसेना - भाजपाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली असून शिवसेनेला १२ मंत्रिपदं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये ५ कॅबिनेट व ७ राज्यमंत्रीपदाचा समावेश असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन शिवसेना - भाजपाची २५ वर्ष जुनी युती तुटली होती. मात्र आता या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येत नव्याने संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी दुपारी भाजपा व शिवसेना नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा पालवे - मुंडे, शिवसेना नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, रामदास कदम आदी नेते उपस्थित होते.  भाजपा व शिवसेनेला मिळालेले यश पाहता जनतेने आघाडी सरकार विरोधात कौल दिल्याचे स्पष्ट होते. आम्ही दोघांनी एकत्र येऊनच सरकार चालवावे अशी इच्छा जनता व दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची होती, त्यासाठी आम्ही पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमची युती वैचारिक असून ती भविष्यातही कायम राहावी यासाठी समन्वय समिती स्थापन करु असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेला १२ मंत्रिपद दिली जातील आणि त्यापैकी १० मंत्री उद्या शपथ घेतील. भाजपाचेही ८ ते १० मंत्री उद्या शपथ घेतील,या सर्वांची नावे आज रात्रीपर्यंत जाहीर करु असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच अन्य घटक पक्षांसोबतही चर्चा सुरु असून त्यांना उद्याच्या विस्तारात किंवा हिवाळी अधिवेशनानंतर होणा-या विस्तारात स्थान देण्याबद्दलचा निर्णयही आज रात्रीपर्यंत होईल असेे त्यांनी नमूद केले. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्रच लढवणार असल्याची घोषणाही याप्रसंगी करण्यात आली. शिवसेना व भाजपाने एकत्र येऊन महाराष्ट्राला मजबूत सरकार द्यायचे ठरवले आहे असे सुभाष देसाई यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाची भूमिका काय या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत असे सूचक विधानही त्यांनी केले. 

----------------

शिवसेना विरोधी बाकावरुन सत्ताधारी बाकावर

विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावरुन शिवसेना - भाजपाची २५ वर्ष जुनी युती तुटली होती. निवडणुकीत  जनतेने भाजपाच्या पारड्यात मत टाकले. मात्र भाजपाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांना शिवसेना किंवा अन्य पक्षांची साथ आवश्यक होती. भाजपाने सरकार स्थापन करुन आवाजी मतदानाद्वारे विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेत सरकारला तारले. तर शिवसेनेनेही विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान होत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावू अशी सिंहगर्जनाही केली. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर अत्यंत आक्रमक शब्दात टीका करत होेते. मात्र आता झाले गेले विसरुन जावे, याचे पालन करत दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. संपूर्ण विरोधी पक्षच सत्तेत सहभागी होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.