शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

‘UGCचा निर्णय हे विद्यार्थ्यांविरोधातील षडयंत्र’, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:06 IST

UGC Bill 2026: प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स – २०२६ ही नियमावली संविधानिक मूल्यांवर, सामाजिक सौहार्दावर आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांवर केलेला उघड उघड हल्ला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी केला आहे.

देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेला राजकीय नियंत्रणाखाली आणण्याचा आणि विद्यार्थी वर्गात विवादाचे बी पेरण्याचा धोरणात्मक प्रयत्न केंद्र सरकार आणि यूजीसी मार्फत होत असल्याचे उघड झाले आहे. प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स – २०२६ ही नियमावली त्याचे स्पष्ट उदाहरण आहे. ही नियमावली संविधानिक मूल्यांवर, सामाजिक सौहार्दावर आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांवर केलेला उघड उघड हल्ला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी केला आहे.

या नियमावलीवरून केंद्र सरकारला थेट इशारा देताना मातोले म्हणाले की, “देशातील युवकांना एकमेकांच्या विरोधात उभे करून आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. यूजीसीचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळ करणारा, समाज विभाजनाला खतपाणी घालणारा आणि देशातील शिक्षण व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारा आहे. केंद्र सरकार आणि यूजीसी विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील ‘टेस्ट सब्जेक्ट’ समजू नयेत, आम्ही हा कट कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही!, असा इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, या नियमावलीत भेदभावाच्या नावाखाली भेदभावच अधिकृत केला जात आहे. यूजीसीने विद्यार्थ्यांच्या हक्कांना चिरडण्यासाठी आणि शिक्षणसंस्थांना गुतंवून ठेवण्यासाठी अत्यंत कपटी पद्धतीने हा निर्णय घेतला आहे. आवाज उठवणाऱ्यांना ‘भेदभाव करणारा’ अशी शिक्कामोर्तब करून युवकांना दाबण्याचा प्रयत्न होतोय. हे मनुवादी, दडपशाही आणि अलोकतांत्रिक पद्धतीचे राज्य आम्ही सहन करणार नाही.

देशभरातील युवक आज रस्त्यावर आहेत, आंदोलन करत आहेत आणि यूजीसीच्या कार्यालयासमोर थेट संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एका उच्च शिक्षण नियामक मंडळाचा परिणाम इतका अस्थिर असेल तर याचा अर्थ सरकारने जाणीवपूर्वक आग लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या निर्णयाच्या विरोधात थेट लढाई लढणार आहे. आम्ही विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत. केंद्र सरकारने ही नियमावली तत्काळ मागे घ्यावी, अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : UGC's decision is anti-student conspiracy: NCP Sharad Pawar Party alleges

Web Summary : NCP alleges the UGC's new regulations are anti-constitutional, divisive, and destroy education. They accuse the government of using students as test subjects and vow to fight the decision, demanding immediate withdrawal of the policy.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रCentral Governmentकेंद्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेस