Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान

By संतोष कनमुसे | Updated: June 24, 2025 13:05 IST2025-06-24T13:01:23+5:302025-06-24T13:05:31+5:30

Raj Thackeray : मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Uddhav Thackeray, Raj Thackeray If both Thackerays do not come together, Marathi people will be disappointed'; MNS leader's big statement | Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान

Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान

Raj Thackeray ( Marathi News ) : 'मराठी माणूस आपल्याकडे खूप आशेने पाहतोय. जर आम्ही असे भांडत राहिलो तर मराठी माणूस आम्हाला क्षमा कसा  करेल? कुणी अगोदर भेटावं, कुणी नंतर भेटावं. कुणी कुणाला काय म्हणावं, हा जगापुढे तमाशा आहे.  एकाच मराठी आईची दोन मुले भांडू लागले तर काय अवस्था होईल',असं मोठं विधान मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू  होत्या. या चर्चा पुन्हा थांबल्याचे दिसले. दरम्यान, आता यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं विधान केलं. 

"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मनसेचे  नेत प्रकाश महाजन यांनी हे विधान केलं . ठाकरे बंधू एकत्र येण्यावर बोलताना महाजन म्हणाले, संजय राऊत यांनी वरिष्ठांसारखे वागले पाहिजेत. जसं आमच्या पक्षाकडून बाळा नांदगावकर दोन वेळा त्यांच्याकडे गेले. बाळा नांदगावकरांनी मातोश्रीवर जाणे म्हणजे प्रत्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाण्यासारखं आहे असं आम्ही मानतो,  मग असे काही प्रयत्न तुमच्याकडून झाले आहेत का?, असा सवाल महाजन यांनी केला. 

"तुमच्याकडून कोण राज ठाकरेंकडे गेलं आहे का? तुम्ही कधी प्रस्ताव ठेवला आहे का? माध्यमात काय सुरू आहे, सर्वसामान्य जनता व्यथित आहे. आज ज्या पद्धतीने सुधाकर बडगुजर यांना भाजपाने पक्षात घेतले. बडगुजर यांचा फोटो दाऊदच्या माणसासोबत आहे. नाच करणाऱ्या माणसाला सत्तेवर येण्यासाठी पक्षात घेतात, जनता कोणाला मतदान करणार? असा सवालही भाजपाला महाजन यांनी केला. 

"इतिहासाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ही जबाबदारी पेलली नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. आज मराठी माणसाचे रक्षण केले नाही तर मराठी माणूस शंभर वर्षे मागे ढकलला जाईल. याची जबाबदारी कोणावर असेल. मराठीची जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून आम्हाला विरोधात उभारले पाहिजे. हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाही तर मराठी माणूस हताश होईल, असं मोठं विधान प्रकाश महाजन यांनी केले. 

राज ठाकरेंना कोणही भेटेल...

काही दिवसापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीवर बोलताना महाजन म्हणाले, राज ठाकरे यांची कोणही भेट घेईल, पण त्यांनी ऐकले का? त्यांनी मराठीचा मुद्दा लावून धरला. मुख्यमंत्री भेटू किंवा पंतप्रधान भेटू त्यांनी त्यांचा मुद्दा ठाम ठेवला आहे, असंही महाजन म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray, Raj Thackeray If both Thackerays do not come together, Marathi people will be disappointed'; MNS leader's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.