कर्नाटकातील दोन महिला ताब्यात

By Admin | Updated: September 23, 2015 02:03 IST2015-09-23T02:03:47+5:302015-09-23T02:03:47+5:30

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात समीर गायकवाडला कटासाठी मदत केल्याच्या संशयावरून कर्नाटकातील दोन महिलांना कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले

Two women in Karnataka are in custody | कर्नाटकातील दोन महिला ताब्यात

कर्नाटकातील दोन महिला ताब्यात

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात समीर गायकवाडला कटासाठी मदत केल्याच्या संशयावरून कर्नाटकातील दोन महिलांना कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांची कसून चौकशी करण्याचे काम दिवसभर सुरू होते. चौकशीत अनेक बाबी उघडकीस आल्या असल्याचेही समजते. पानसरे हत्येचा कट कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरमध्ये समीरसह मडगाव बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंड रुद्र पाटील, सारंग अकोळकर-कुलकर्णी यांनी रचल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आल्याने पोलिसांची धावपळ उडाली. हत्येचे कनेक्शन संकेश्वर-खानापूर, गोवा, मडगाव असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Web Title: Two women in Karnataka are in custody