राज्यात पावसाचे दोन बळी

By Admin | Updated: June 1, 2015 05:06 IST2015-06-01T05:06:16+5:302015-06-01T05:06:16+5:30

एकीकडे राज्याच्या काही भागांत उष्णतेची लाट कायम असतानाच रविवारी सायंकाळी बीड, नगर, सोलापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला़ नगरमध्ये दोघांचा बळी गेला आह़े

Two rains of rain in the state | राज्यात पावसाचे दोन बळी

राज्यात पावसाचे दोन बळी

मुंबई : एकीकडे राज्याच्या काही भागांत उष्णतेची लाट कायम असतानाच रविवारी सायंकाळी बीड, नगर, सोलापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला़ नगरमध्ये दोघांचा बळी गेला आह़े
अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात रविवारी जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला़ नेवासा तालुक्यात एकाचा वीज कोसळून तर कर्जत तालुक्यात छप्पर कोसळून बळी गेला़ रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे वादळी पावसात छप्पर अंगावर पडून सर्जेराव मारुती गायकवाड (५६) यांचा मृत्यू झाला़ दुसऱ्या घटनेत नेवासा तालुक्यातील बकूपिंपळगाव येथे दुपारी ४़ ३० च्या सुमारास वीज कोसळून भाऊसाहेब सुनील पातारे (२४) हा जागीच ठार झाला़ दरम्यान जामखेड तालुक्यातील चौंडी परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली़ जवळपास अर्धातास पाऊस सुरू होता़ गेल्या दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. धारुर, केज, परळी, आष्टी येथे सरी बरसल्या तर पाटोदा तालुक्यातील महासांगवी, वीज पडून दोन जनावरे दगावली. नगर जिल्हा, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग आणि खटाव तालुक्याचा काही भाग, वडूज या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने रविवारी दाणादाण उडवून दिली आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

Web Title: Two rains of rain in the state