शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

दोन परिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, जामिनासाठी कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 03:00 IST

Bhandara fire : दोन्ही परिचारिकांनी अटकपूर्व जामिनासाठी भंडारा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

भंडारा : देशाला हादरवून टाकणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अकरा नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोन अधिपरिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा गुरुवारी उशिरा रात्री भंडारा ठाण्यात दाखल करण्यात आला. दोन्ही परिचारिकांनी अटकपूर्व जामिनासाठी भंडारा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तब्बल ४० दिवसांनंतर या प्रकरणात पोलीस कारवाई झाली. यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर निलंबन, सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली होती. स्मिता संजयकुमार आंबिलढुके (३४, रा. ग्रामसेवक कॉलनी, खात रोड, भंडारा) आणि शुभांगी यादवराव साठवणे (३२, रा. सिव्हिल लाइन, राजगोपालाचारी वॉर्ड, भंडारा) अशी गुन्हे दाखल झालेल्या अधिपरिचारिकांची नावे आहेत. २१ जानेवारी रोजीच या दोघींचीही सेवा शासनाने समाप्त केली होती. साकोली उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण शिवाजी वायकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून भंडारा ठाण्यात भादंवि कलम ३०४ (पार्ट २) आणि ३४ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील करीत आहेत. 

अहवाल प्राप्त- अग्निकांडाचा न्यायवैद्यक अहवाल (फॉरेन्सिक रिपोर्ट) पोलिसांना प्राप्त झाला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी या बाबीला दुजोरा दिला. - प्रकरण चौकशीत असल्याने अहवालात नेमके काय आहे हे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगCourtन्यायालय