शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्याच्या बाळाला विहिरीत टाकले

By admin | Updated: August 1, 2014 02:20 IST

जळगाव जामोद तालुक्यातील घटना : अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल.

जळगाव जामोद : अंत:करण हेलावून सोडणारी व संताप निर्माण करणारी अशी घटना आज दुपारी सुलज गावात घडली. क्षितीज अनंता काटोले या दोन महिन्याच्या बालकाला घरातून नेऊन विहिरीत टाकून देण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. या मागे काही अंधश्रद्धेचा तर भाग नाही ना, अशी चर्चा सुलज या गावात आहे.तालुक्यातील सुलज येथील काटोले कुटुंबात दोन बालकांसह आठ जणांचा परिवार. अनंता उत्तमराव काटोले यांचे एक वर्षापूर्वी लग्न झाले. दोन महिन्यांपूर्वी त्यांना एक मुलगा झाला. आज दुपारी २ वाजता घरी बाळ, बाळाची आई, अनंताचे मोठे बंधू सुपडा यांचा दोन वर्षाचा मुलगा असे तिघे जण होते. क्षितीज याला जाळीच्या छत्रीखाली ठेवण्यात आले होते. बाळाची आई स्वच्छतागृहात गेली होती. आल्यानंतर तिला छत्रीत बाळ दिसला नाही. म्हणून तिने आकांत केला आणि तसेच जळगाव येथे चैतन्य बालक मंदिरात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पतीला तिने या घटनेची माहिती दिली. बाळाचे आजोबा उत्तमराव काटोले हे एका दशक्रियेसाठी गेले होते. त्यांनाही माहिती देण्यात आली. सर्वजण गोळा झाल्यानंतर बाळाचा परिसरात शोध घेण्यात आला; परंतु बाळ दिसले नाही म्हणून घरापासून ५0 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत सहज डोकावून पाहिले असता त्यावर या बाळाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर या घटनेची फिर्याद जळगाव पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, ठाणेदार एम.एस. भोगे तपास करीत आहेत. *घटनेचे गूढ कायमघडलेली घटना ही अंधश्रद्धेतून घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बाळाचे वय हे अवघे दोन महिन्याचे असल्याने ते रांगत विहिरीपर्यंत जावू शकत नाही. दुसरे असे की बाळाची आई अवघ्या पंधरा मिनिटाकरिता स्वच्छतागृहात गेली असताना हा प्रकार घडला. म्हणजेच कोणीतरी यावर पाळत ठेवून असावे. बाळ हे अगदी छत्रीखाली सुरक्षित झोपलेले होते. याचा अर्थ या बाळाला घरी येऊन कोणीतरी उचलून नेले आणि नजीकच्या विहिरीत टाकून इसम फरार झाला असावा. अंधश्रद्धेच्या काही प्रकारात नरबळी अपेक्षित असतो. अशा प्रकारातून हे कृत्य संबंधित व्यक्तींनी केले काय, अशी शंका बळावते. अनंता काटोले यांचे हे पहिलेच अपत्य होते. इतर कोणी घरी नाही, याचा नेमका फायदा सदर कृत्य करणार्‍याने घेतल्याचे दिसते. पोलिस तपासाअंती सत्य काय ते निश्‍चित बाहेर येईल.