शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

दोनशे वर्षे पुरातन मनमाला देवी मंदिर, देवीच्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांपैकी एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 2:34 AM

देवीच्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे, माटुंगा येथील श्रीमनमाला देवी मंदिर. दोनशे वर्षांपूर्वी स्थानिक शिवाजी सावंत यांनी हे मंदिर बांधले.

- अक्षय चोरगे मुंबई : देवीच्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे, माटुंगा येथील श्रीमनमाला देवी मंदिर. दोनशे वर्षांपूर्वी स्थानिक शिवाजी सावंत यांनी हे मंदिर बांधले. मंदिर असलेल्या परिसरात दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी, सध्याच्या माटुंगा ब्रिजपासून ते स्टार सिटी सिनेमापर्यंत पसरलेले मोठे तळे होते, या तळ्याचे नाव ‘मनमाला’ असल्याने, देवीचे नावही ‘मनमाला’ पडल्याचे स्थानिक सांगतात. वेगवेगळ्या सात देवींच्या मूर्ती मंदिरात असल्याने, ‘सात आसरा मनमाला देवी’ असेही म्हटले जाते.मंदिर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस जय-विजय असे द्वारपाल आहेत. मंदिरात प्रवेश करताच, डाव्या बाजूला एक प्राचीन विहीर आहे. विहिरीच्या बाजूला एका उंचवट्यावर देवीचा मुखवटा आहे. त्यास ‘गावदेवी’ असे म्हटले जाते. जरा पुढे गेल्यावर देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या गाभाºयात एका उंचवट्यावर देवीच्या सात स्वयंभू दगडी मूर्तींसह कृष्ण आणि गणपतीची मूर्ती आहे.मूर्तींमध्ये गणपती, संतोषीमाता, राखणदार कान्हू गवळी (कृष्ण-देवीचा भाऊ), चंपावती देवी, केवडावती देवी, मनमाला देवी, जरीमरी देवी, शितळा देवी आणि खोकला देवी अशा क्रमाने देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराशेजारी शिवलिंग आणि मारुती मंदिर आहे.मंदिरात दर मंगळवारी आणि शुक्रवारी गर्दी असते. मंदिरात चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्रौत्सव साजरे केले जातात. चैत्र महिन्यात साध्या पद्धतीने उत्सव होतो. मंदिरात साजरा होणारा अश्विन महिन्यातील नवरात्रौत्सव आसपासच्या परिसरात प्रसिद्ध आहे.