शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरीसाठी गर्दुल्ल्यांचा दोघांवर हल्ला

By admin | Updated: June 8, 2017 02:26 IST

गोवंडी-शिवाजीनगर हे सध्या अमलीपदार्थांचा अड्डा बनले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोवंडी-शिवाजीनगर हे सध्या अमलीपदार्थांचा अड्डा बनले आहे. अमलीपदार्थाच्या नशेसाठी अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळले आहेत. सोमवारी रात्री याच परिसरात चार गर्दुल्ल्यांनी मोबाइल चोरीसाठी दोन तरुणांवर चाकूने हल्ला केला. या दोन्ही तरुणांवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.मोहम्मद सैफ आणि आरिफ कालिया अशी या जखमी तरुणांची नावे आहेत. ते गोवंडीच्या रफिकनगर परिसरात राहणारे आहेत. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोघेही नैसर्गिक विधीसाठी डम्पिग ग्राउंडकडे गेले होते. त्यानंतर दोघेही घरी परतत असताना कब्रस्तान गार्डन परिसरात नशा करणाऱ्या चार गर्दुल्ल्यांनी त्यांना अडवले. या गर्दुल्ल्यांनी दोन्ही तरुणांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. दोघांनी विरोध करताच या आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने या दोघांवर वार केले. या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. काही रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात येताच, त्यांनी तत्काळ या तरुणांना सायन रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मंगळवारी या प्रकरणी दोघांना अटकदेखील करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत गोवंडी-शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांची तस्करी वाढली आहे. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी घटना वाढत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.