शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीशांशी चर्चा

By admin | Updated: December 17, 2014 00:25 IST

सर्किट बेंच : सदानंद गौडा यांची ग्वाही

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा, इमारती कोल्हापुरात उपलब्ध असताना वकिलांना रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करावे लागणे हे योग्य नाही. दोन दिवसांत आपण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्किट बेंचच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू, अशी नि:संदिग्ध ग्वाही केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी आज, मंगळवारी कोल्हापुरातील वकिलांच्या शिष्टमंडळाला दिली. उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करावे या मागणीसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे शिष्टमंडळ आज केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांना भेटले. सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेत मंत्री गौडा यांनी वकिलांची मागणी समजावून घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती वकिलांनी मंत्र्यांना दिली. कोल्हापुरात सर्किट बेंचसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, इमारती उपलब्ध आहेत तरीही मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे म्हणून वकिलांनी आंदोलन सुरू केले. सहा जिल्ह्यांतील वकिलांनी सलग ५५ दिवस कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी दाद दिली. तीन न्यायाधीशांची समिती नेमून पाहणी करण्याचे आश्वासन दिले. ३१ जानेवारी २०१४ पर्यंत निर्णय देण्याचे आश्वासन देऊनही मुख्य न्यायाधीशांनी पाळले नाही. त्यामुळे आता वकिलांचे आंदोलन हिंसक बनत चालले आहे,अशी माहिती शिष्टमंडळातील सर्वच वकिलांनी कायदामंत्र्यांना दिली तसेच आंदोलन, पायाभूत सुविधा याबाबतची काही छायाचित्रेही दाखविली. कोल्हापुरात सर्व सुविधा असताना आणि वकीलच आंदोलन करताहेत म्हटल्यावर सर्किट बेंचबाबत एवढा विलंब होणे योग्य नाही, असे सांगत मंत्री गौडा यांनी आश्चर्य व्यक्त केले. एखाद्या मागणीसाठी वकिलांनीच रस्त्यावर येणे अपेक्षित वाटत नाही. विशेष म्हणजे सर्किट बेंचसाठी पायाभूत सुविधा असतानाही निर्णय प्रलंबित ठेवायचे कारण नाही. याबाबत लवकरच मुख्य न्यायाधीश व मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. राज्यात आणि देशात भाजपचे सरकार असल्याने सर्किट बेंच होण्याबाबत अडचण येणार नाहीत, असे गौडा यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथील शास्त्री भवनमध्ये मंत्री सदानंद गौडा यांना भेटलेल्या शिष्टमंडळात खासदार धनंजय महाडिक यांच्यासह बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक घाटगे, सचिव राजेंद्र मंडलिक, अजित मोहिते, राजेंद्र किंकर, प्रशांत चिटणीस, बी. आर. पाटील, सर्वोच्च न्यायालयातील डॉ. विद्या वाकळे आदी वकिलांचा समावेश होता. (प्रतिनिधी)