शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

वीस शेतकरी ऊसलागवडीपासून वंचित

By admin | Updated: July 11, 2017 00:48 IST

वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी या ठिकाणच्या वीस शेतकऱ्यांना ३५ ते ४० एकर अडसाली ऊसलागवडीपासून वंचित राहावे लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : येथील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी या ठिकाणच्या वीस शेतकऱ्यांना ३५ ते ४० एकर अडसाली ऊसलागवडीपासून वंचित राहावे लागले आहे. वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी या ठिकाणावरील सोळाआंबा येथील विद्युत रोहित्र २० जून रोजी जळाले होते. यावर अनेक शेतकऱ्यांनी वितरणचे संबंधित अधिकारी वरिष्ठ अभियंता म्हेत्रे तसेच कनिष्ठ अभियंता दीपक पाचुंदकर यांना भेटून तसेच लेखी तक्रार दिली.तरीदेखील या अधिकाऱ्यांनी याकडे काणाडोळा केल्याने ४० एकरांवरील अडसाली उसाची लागवड झाली नाही. सोमेश्वर कारखाना दि. १ जुलै ते ७ जुलै दरम्यान अडसाली ऊस लागवडीचा कार्यक्रम जाहीर करत असतो. या कालावधीत केल्या जाणाऱ्या अडसाली उसाच्या लागवडी पुढील हंगामात कारखाना सुरू होताना जात असतात. तर एक दिवस उशिरा केलेली उसाची लागवड तब्बल अडीच ते तीन महिन्यांनंतर कारखान्याला तुटून जाते. शेतकऱ्यांनी २० जूनपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांचा पाठपुरावा केला होता. ‘साहेब, डीपी १ तारखेपर्यंत तरी बसवा राव. आमच्या लागणी राहतील..’ मात्र, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातच एक मत नसल्याने आज बसवू उद्या बसवू करत गेल्या वीस दिवसांपासून रोहित्र बसविले गेले नाही. आणि कारखान्याने ठरवून दिलेली अडसाली उसाची लागवड तारीख संपून गेल्यावर ४० एकरांवरील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, दर महिन्यात घरगुती बिले वाढवून देणे हे महावितरण चे नित्याचेच झाले आहे. वास्तविक वापर कमी असतानाही ग्राहकांना वीज बिलाचे आकडे वाढवून दिले जात असल्याने ग्राहकांना बिल कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. तर अनेक वीजबिलांवर मीटरचे फोटोच नसतात. >हजारो ग्राहकांना जादा बिलाचा फटका...महावितरणच्या रीडिंग घेण्यासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्याकडून दर महिन्याच्या ५ तारखेला घरगुती मीटरचे रीडिंग घेतले जात होते. मात्र, मागच्या महिन्यात २० तारखेला उशिरा रीडिंग घेतल्याने अनेक ग्राहकांचे १०० युनिटच्या रीडिंगच्या पुढे रीडिंग गेल्याने त्यांना ३ रूपये ५० पैशांऐवजी एका युनिटला ७ रूपये मोजावे लागले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हजारो ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागला आहे. अनेक वीजबिलांवर मीटरचे फोटोच नसतात. ती बिले गेल्या महिन्याच्या बिलावर अंदाजेच दिली जातात.वाणेवाडी-मळशी येथील जळालेले रोहित्र बदलण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून ते अजूनही उपलब्ध झाले नाही. ते उद्या उपलब्ध होणार आहे. तसेच मुरूम याठिकाणी ग्राहकांचे युनिट जरी जादा झाले असले तरीही त्यांना ३ रूपये ५० पैशांप्रमाणेच युनिट दर लावला आहे.-दीपक पाचुंदकर, कनिष्ठ अभियंता, सोमेश्वरनगर महावितरण