शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबा पालखी पंढरपूर तालुक्यात

By admin | Updated: July 25, 2015 01:31 IST

गुरुवारचा माळशिरस तालुक्यातील बोरगावचा मुक्काम संपवून बोंडले येथील धाव्याचा आनंद घेत वारकऱ्यांचा सोहळा पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे विसावला़

शहाजी फुरडे-पाटील  पिराची कुरोली (सोलापूर)सिंचनकरिता मूळ,वृक्ष ओलावे सकळ,नको पृथकाचे भरी, पडो एक सार धरी,पान चोऱ्याचे पार, वरील दाटावे ते थोर,वश झाला राजा, मग आपल्या त्या प्रजा,एक आतुडे चिंतामणी, फिटे सर्व सुख धनी,तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा...गुरुवारचा माळशिरस तालुक्यातील बोरगावचा मुक्काम संपवून बोंडले येथील धाव्याचा आनंद घेत वारकऱ्यांचा सोहळा पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे विसावला़ वारकरी ज्ञानोबा- तुकारामांचा गजर करीत होता़पालखी सोहळा बोंडल्याच्या दिशेने जात असताना गावाच्या अलीकडे डोंगराच्या उतारावर संत तुकाराम महाराजांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचे शिखर दिसले होते, अशी वारकऱ्यांची धारणा आहे़ त्यामुळे पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेला वारकरी तुकोबा-तुकोबा असा जयघोष करीत धावत होता़ या उतारावर बाळासाहेब मोरे महाराज, ह़भ़प़ पुंडलिक मोरे महाराज देहूकर, काकासाहेब चोपदार हे एकेका दिंडीला धावण्यासाठी सोडत होते़ संत तुकाराम महाराजांची पालखी दसूर पाटी येथून टप्पा येथे विठ्ठलाचे साम्राज्य असलेल्या पंढरपूर तालुक्यात दाखल झाली.सुमारे २२५ किमीचे अंतर पायी चालत आलेला हा सोहळा हिरव्यागार अशा पिराची कुरोली पालखी तळावर विसावला़