शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा खबरी असल्याने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:42 IST

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

पुणे - पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली़विक्की दिलीप दिघे (वय २६, रा़ संकेतविहार, काळेपडळ, हडपसर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे़ वानवडी पोलिसांनी आकाश बालभारती, सनी हिवाळे व त्याच्या पाच साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़याप्रकरणी किरण चव्हाण (वय २६, रा़ हडपसर) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की चव्हाण व त्याचे मित्र राहुल तडवी, तन्वीर शेख, विक्की दिघे हे काळेपडळ येथील श्रीगणेश मोबाईल शॉपीसमोर बोलत थांबले होते़ तेव्हा काही जण मोटारसायकलवरून आले़ त्यातील सनी हिवाळे याने राहुल तडवी याला तू पोलिसांना माझी टीप का देतो व आम्ही फोरव्हीलर फोडली, याची पोलिसांना टिप का दिली, असे म्हणून त्याने सर्वांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली़आकाश बालभारती याने कंबरेचा कोयता काढून विक्की दिघे याच्या डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले़ तसेच पोलिसांमध्ये तक्रार दिली, तर जीवे मारण्याची धमकी देऊन तेथे जमाव जमवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली़ त्यामुळे घाबरून लोक पळून गेले़ तेथील दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली़आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर असे मारामारीचे गुन्हे दाखल आहेत़ याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही़ ए़ पवार अधिक तपास करीत आहेत़ 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे