शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नमाज अदा करणारा सच्चा मुसलमान; एक पक्का योगी

By admin | Updated: June 19, 2015 23:49 IST

दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणारा सच्चा मुसलमान एक पक्का योगी आहे. कारण नमाजामध्ये ताडासन, वज्रासन, पादहस्तासन, वक्रासन यांसारखी आसने येतात.

अंजली भुजबळ,  नवी मुंबईदिवसातून पाच वेळा नमाज अदा करणारा सच्चा मुसलमान एक पक्का योगी आहे. कारण नमाजामध्ये ताडासन, वज्रासन, पादहस्तासन, वक्रासन यांसारखी आसने येतात. त्यामुळे मुस्लिमांनी योगाला विरोध करणे कदाचित चुकीचे आहे असे मला वाटते, असे वक्तव्य मुस्लीम योगगुरू फिरोज खान यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील बांधवांना आणि इतरांनाही सुदर्शन क्रिया, प्राणायाम, अध्यात्माचे वैज्ञानिक महत्त्व पटवून देण्याचे काम फिरोज खान करीत आहेत. देशभरात राष्ट्रीय एकात्मता, शांतता नांदण्यासाठी योग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांचे मत आहे. योग ही स्वत:शी आणि ईश्वराशी जोडण्याची एक प्रक्रिया आहे. शरीर, मन, बुद्धी आणि आपल्या अस्तित्वाचे सात स्तर योगाच्या माध्यमातून एकत्र येतात. मानसिक ताण योगाच्या माध्यमातून कमी होतो आणि तो कमी झाला की शरीरातील व्याधी दूर होतात. आजच्या तरुण पिढीची समाजाशी नाळ तुटत आहे, ती या योगाच्या माध्यमातून जोडण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे फिरोज खान यांनी सांगितले.युनो संघटनेने आंतराष्ट्रीय योग दिनाला मान्यता दिल्याने भारतीय प्राचीन परंपरेचा सन्मान झाला आहे. जगभरातील ४७ मुस्लीम देशांत २१ जूनला योग दिन साजरा केला जाणार आहे. प्रत्येक मुस्लिमाने योग समजला पाहिजे, नमाज ही एक योग साधना आहे असे सांगून, सर्व समाजातील बांधवांनी हा योग दिन साजरा करून योगाचा डंका जगभरात पसरवावा, असे आवाहन फिरोज खान यांनी केले.मला सुरु वातीला वाटलं की, योगासने ही केवळ हायप्रोफाइल लोकांसाठी असतात. मात्र मी जेव्हा योगाचे प्रशिक्षण घेतले तेव्हा याचे महत्त्व कळले. मी ६५ वर्षांचा असून, योगासने करतो. यामुळे माझा मधुमेहाचा त्रास कमी झाला असून, रक्तदाब सामान्य आहे. समाजातील बांधवांनी नक्की योगासनांचे प्रशिक्षण घ्यावे. - खुर्शीद जिलानी, नगरसेवक, तालुका अंबडयोगासने ही मुस्लिमांसाठी नसून केवळ गैरमुस्लीम बांधवांसाठी आहे अशी माझी धारणा होती, मात्र फिरोज खान यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर मला योग समजला. १,४५० वर्षांपूर्वी पैगंबरांनी नमाज शिकविला त्यात अनेक आसने आहेत. ती केवळ आजच्या पद्धतीने समजून घेणे आवश्यक आहे. योगासने सर्वांनीच करणे गरजेचे आहे. - फहीम शेखफिरोज खान आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. माझा फिरोज खानला यासाठी पहिल्यापासून पाठिंबा आहे. आज भारतात ५०० जाती असल्या तरी मी स्त्री आणि पुरु ष या दोनच जाती मानतो. कुराण व ज्ञानेश्वरांचे पसायदान एकच शिकवण देतात ती समजणे गरजेचे आहे. - फकरु द्दीन शहाबुद्दीन, फिरोज खान यांचे आजोबा आणि माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद, अंबडदहा वर्षांपूर्वी अंबडमध्ये युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर झाले तेव्हा आम्हाला फिरोज खान हा हिरा सापडला. हा एकमेव मुस्लीम विद्यार्थी या कोर्सला होता. त्यांच्या मनाची स्थिती, जिद्द याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ते आज या योगासनांच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. मी यांचा गुरू आहे याचा अभिमान आहे. - जयंत भोळे, योग प्रशिक्षक, आर्ट आॅफ लिव्हिंगमी आयटीआयचा विद्यार्थी आहे. मला योगप्रशिक्षणामुळे ऊर्जा मिळाली असून माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. स्वत:ची कामे मी स्वत: करायला शिकलो आहे.- शेख हर्षद जिलानी, विद्यार्थी