शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

याकूब मेमनच्या फाशीची नागपूर कारागृहात ट्रायल

By admin | Updated: July 17, 2015 23:52 IST

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला मृत्युदंड देणाऱ्या ‘टीम येरवडा’कडे याकूब मेमनच्या मृत्युदंडाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार

- नरेश डोंगरे, नागपूरमुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला मृत्युदंड देणाऱ्या ‘टीम येरवडा’कडे याकूब मेमनच्या मृत्युदंडाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार, ही टीम नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तयारीला लागली असून, फाशी यार्डात ट्रायलही सुरू झाली आहे.कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारानंतरचे दार ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला (उत्तर दिशेला) साधारणत: २०० फूट अंतरावर फाशी यार्ड आहे. याकूबला फाशी देण्यापूर्वीची प्रक्रिया काळजीपूर्वक आणि विलक्षण गोपनीयता बाळगून राबविली जात असून, येथील सिमेंटच्या चौथऱ्याची २९ वर्षांनंतर पहिल्यांदाच डागडुजी करण्यात आली आहे. कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांच्याकडे विचारणा केली असता, याकूबसंदर्भात आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे ते सांगतात.दोन वर्षांपूर्वी येरवडा कारागृहात अधीक्षक असताना देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसाबला फासावर लटकवले होते. हीच टीम काही दिवसांपूर्वी येथील मध्यवर्ती कारागृहात बदलीवर आली आहे. १५ ते १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या या चमूने ‘ट्रायल’ही सुरू केली आहे. ज्याला फाशी द्यायची आहे, अशा व्यक्तीची उंची अन् तेवढेच वजन असलेला ‘डमी’ तयार केला जातो. किमान दोन आठवड्यांपूर्वीच फाशीची ट्रायल सुरू होते. ‘डमी’ला या दोन आठवड्यांत अनेकदा फासावर लटकविले जाते. काही अडचणी आहेत काय हे तपासण्यात येते.दोराला केळी अन् मधाची पेस्टफाशी देण्यासाठी विशेष प्रकारचा दोर तयार केला केला जातो. सूत्रांच्या माहितीनुसार, तागाच्या धाग्यापासून बनविलेल्या या दोराला तेलात मुरविले जाते. केळ्यांची पेस्ट आणि मधाचे मिश्रण लावून हा दोर तयार केला जातो. तो सहज नरम बनावा, फास आवळताना मध्येच अडकू नये यासाठी हे सर्व केले जाते.