कंटेनरमध्ये बंद करून तरुण-तरुणींची वाहतूक, तस्करीचा संशय, तपासातून समोर आली धक्कादायक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:45 PM2023-01-20T23:45:32+5:302023-01-20T23:45:56+5:30

Sindhudurg : मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरमध्ये भरून तरुण तरुणींना नेत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील एका गावामध्ये खळबळ उडाली. संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांना हा कंटेनर अडवला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले

Transportation of young women locked in containers, suspicion of smuggling, shocking information came out from the investigation | कंटेनरमध्ये बंद करून तरुण-तरुणींची वाहतूक, तस्करीचा संशय, तपासातून समोर आली धक्कादायक माहिती 

कंटेनरमध्ये बंद करून तरुण-तरुणींची वाहतूक, तस्करीचा संशय, तपासातून समोर आली धक्कादायक माहिती 

Next

मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरमध्ये भरून तरुण तरुणींना नेत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील एका गावामध्ये खळबळ उडाली. संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांना हा कंटेनर अडवला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र पोलीस तपासामध्ये कंटेनरमधून नेण्यात येत असलेली मुलं-मुली हे कॅटरिंगचं काम करणारी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या मळगाव गावामधील बाजारपेठेतून एक कंटेनर जात असताना त्यातून आरडाओरडा होत असल्याचा आवाज बाहेर आला. त्यामुळे ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी हा कंटेनर अडवला. त्यानंतर कंटेनर उघडला असता त्यामध्ये काही मुले आणि मुली असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा मानवी तस्करीचा प्रकार असावा, असा संशय बळावल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासास सुरुवात केली. तसेच सदर कंटेरन पोलीस ठाण्यात नेऊन अधिक तपास केला असता सदर तरुण तरुणी हे कॅटरिंग व्यवसायाशी संबंधित असल्याचे तसेच ते जवळच्याच गावात जेवणाच्या कामासाठी आल्याचे निष्पन्न झाले. मात्र सदर कंटेरनचालकाने कंटेनरमधून मानवी वाहतूक केल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Transportation of young women locked in containers, suspicion of smuggling, shocking information came out from the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.