शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

हस्तांतर इंडोनेशिया सरकारवर अवलंबून

By admin | Updated: October 27, 2015 01:48 IST

छोटा राजनला इंडोनेशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी अटक केली असली, तरी त्याला भारतात आणणे केंद्र सरकारसाठी सहजसाध्य नसल्याची चिन्हे आहेत.

जमीर काझी, मुंबईछोटा राजनला इंडोनेशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी अटक केली असली, तरी त्याला भारतात आणणे केंद्र सरकारसाठी सहजसाध्य नसल्याची चिन्हे आहेत. इंडोनेशियाबरोबर आरोपी प्रत्यार्पण करार नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. इंडोनेशिया सरकारने अवैध वास्तव्याबाबत त्याला हद्दपार (डिपोर्ट) केल्यास त्याला ताब्यात घेणे शक्य आहे. त्यासाठी केंद्र सरकारने इंडोनेशियावर दबाव आणून पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केले. ‘मोस्ट वॉन्टेड’ छोटा राजनच्या अटकेमुळे गुन्हेगारीजगतात काहीशी खळबळ नक्कीच उडाली आहे. विविध विकारांनी छोटा राजन त्रस्त असल्याने, सध्या तो गुन्हेगारी कारवायांमध्ये थेट सक्रिय नव्हता. पडद्यामागून सूत्रे मात्र हलवित असे. छोटा राजनचे नेटवर्क सक्षमपणे कार्यरत असल्याने, त्याच्या गँगच्या मुंबईतील कारवायांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. छोटा राजनच्या प्रत्यार्पणाबाबत ज्येष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘आरोपी प्रत्यार्पण करार नसणे, ही प्रमुख अडचण आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची अटक महत्त्वाची असल्याचे केंद्र सरकारने पटवून दिल्यास, त्याचा ताबा मिळू शकतो. छोटा राजनचे दाऊद टोळीशी असलेले वैमनस्य सर्वज्ञात आहे. त्यामुळे तो नेहमीच सुरक्षा कवचामध्ये वावरत होता. अशा परिस्थितीत तो बेसावध कसा राहिला, हा प्रश्न असल्याचे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. भारताने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता विचारात घेऊन भारतीय यंत्रणांनादेखील पुरेशी खबरदारी घ्यावी लागणार आहे.’ माजी आयपीएस अधिकारी व ज्येष्ठ वकील वाय. पी. सिंग म्हणाले, ‘राजन बनावट पासपोर्टच्या आधारे वास्तव्य करत होता. त्यामुळे इंडोनेशिया सरकारच्या दृष्टीने तो गुन्हेगार आहे. केंद्र सरकारने पाठपुरावा केल्यास तो ताब्यात येऊ शकतो. मात्र, किती कालावधी लागेल, हे सांगणे तूर्तास शक्य नाही.’ अ‍ॅड. के.पी. पवार म्हणाले, ‘भारताने ताब्यात घेण्याचे प्रयत्न तत्परतेने करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय गृह विभागाकडे पाठपुरावा केला पाहिजे.’