शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलविना पर्यटकांची चाके थांबली...

By admin | Updated: May 20, 2015 00:15 IST

विनाकारण खोळंबा : ऐन पर्यटनाच्या हंगामात उभे राहिले नवे संकट, पर्यटकांच्या फिरतीला टंचाईचा ब्रेक

रत्नागिरी : सुट्टीचा हंगाम असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले आहेत. मात्र तेवढ्यातच पेट्रोल, डिझेलची टंचाई सुरू झाल्याने पर्यटकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. मुंबई, पुण्याहून आलेल्या पर्यटकांना गाडीत इंधन नसल्यामुळे परतणे अशक्य झाले असून स्वत:चे वाहन आणूनही त्यांना अडकून पडावे लागले आहे.सुट्टीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात आले आहेत. रविवारपासूनच पंपावरील पेट्रोल संपल्याचे फलक लावण्यात आले होते. शहरातील केवळ एका पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध होते. मात्र त्याठिकाणी पेट्रोल मिळवण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. त्यातच काही नागरिक कॅन, बाटलीमधूनही पेट्रोल नेत असल्याने व पेट्रोलटंचाईच्या भीतीने अनेक वाहनचालकांनी हजार ते दीड हजार रुपयांचे पेट्रोल भरणे पसंद केले. त्यामुळे आलेले पेट्रोल, डिझेलचे टँकर झटपट खाली होत होते.सध्या पर्यटन हंगामामुळे रत्नागिरी, गणपतीपुळे, दापोली, गुहागर आदी ठिकाणी हॉटेल्स फुल्ल आहेत. त्याचबरोबर मुंबईकरही खासगी गाड्या घेऊन रत्नागिरीत आले आहेत. पंपावर पेट्रोल नसल्यामुळे त्यांना परतणे अशक्य झाले होते. वाटेतील अन्य पेट्रोलपंपसुध्दा बंद असल्यामुळे तेथे पोहोचणे शक्य नव्हते. काही ठिकाणी जादा पैसे घेऊन पेट्रोल विकण्यात आले. शक्य होते, त्या मंडळींनी अधिक पैसे देऊन पेट्रोल खरेदी केले. अनेक पर्यटक केवळ पेट्रोल नसल्याने अडकून पडले आहेत. या साऱ्या गदारोळात हॉटेल्स, लॉजिंग मात्र फुल्ल झाली आहेत. शनिवार, रविवार सुट्टी घेऊन आलेल्या काही पर्यटकांना सोमवारी परतणे गरजेचे असतानादेखील परतणे शक्य झाले नाही.मंगळवारी शहरातील काही पेट्रोलपंपावर पेट्रोल आले असले तरी सायंकाळपर्यंत पंपावरील गर्दी ओसरली नव्हती. काही पर्यटकांनी सकाळपासूनच रांग लावून दुपारनंतर रत्नागिरी सोडल्याचे काही हॉटेल्स व्यवसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ऐन सुट्टीच्या हंगामातील पेट्रोल पंप बंदचा फटका पर्यटकांना बसला तरी हॉटेल व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरला.सध्या असलेली पेट्रोलटंचाईची परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे आणखी दोन दिवस पर्यटकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.(प्रतिनिधी)नाहक मुक्काम वाढला.पुण्यातून आम्ही शनिवारी आलो होतो. गणपतीपुळे व रत्नागिरी पाहून रविवारी रात्री परतण्याचे नियोजन होते. रत्नागिरीत रात्री भोजन केल्यानंतर पेट्रोल घेण्यासाठी पंपावर गेलो तर पंप बंद होते. सोमवारीही पेट्रोल उपलब्ध झाले नाही. आज दुपारी पेट्रोल मिळाले. त्यामुळे नाहक मुक्काम वाढवावा लागला.-पी. एन. देशपांडे, पर्यटक (पुणे) गाडीत इंधन नसल्यामुळे परतणे अशक्य.रविवारपासूनच पंपावरील पेट्रोल संपल्याचे फलक.रत्नागिरी शहरातील केवळ एका पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध.पेट्रोलटंचाईची परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता .पेट्रोल खरेदीसाठी तारेवरची कसरत.