शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाच्या नावाखाली पर्यटन

By admin | Updated: September 23, 2015 01:18 IST

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकडे साफ दुर्लक्ष करून संचालक मंडळाने मनमानी कर्जवाटप व तारण मालमत्तेची विक्री केल्यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच;

नामदेव मोरे, नवी मुंबईरिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकडे साफ दुर्लक्ष करून संचालक मंडळाने मनमानी कर्जवाटप व तारण मालमत्तेची विक्री केल्यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच; शिवाय रिझर्व्ह बँकेने ठोठावलेल्या दंडाचा भुर्दंडही सोसावा लागला. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली संचालकांनी केलेले केरळ व काश्मीरचे पर्यटन बँकेला ७ लाख ३० हजार रुपयांना पडले. राज्यातील सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी १९११ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली आहे. सहकार चळवळ रुजविण्यामध्ये या बँकेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे; परंतु मागील काही वर्षांत संचालक मंडळाच्या कारभारामुळे या शिखर बँकेची प्रतिमा मलिन झाली आहे. संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे बँकेला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सहकारी संस्थांमधील पदाधिकारी विविध ठिकाणी अभ्यासदौरे करीत असतात. संबंधित संस्थेला फायदा व्हावा, असा अंतस्थ हेतू या दौऱ्यांमागे असतो. परंतु राज्य शिखर बँकेच्या संचालकांनी अभ्यासाच्या नावाखाली चक्क केरळ व काश्मीरची पर्यटन ‘एन्जॉय’ केले. त्यासाठी बँकेतून घेतलेली ७ लाख ३० हजार रुपयांची आग्रीम रक्कमही भरलेली नाही. या आरोपांसंदर्भात २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेग्युलेशन अ‍ॅक्ट १९४९ चे कलम ३५ (ए) अन्वये राज्य शिखर बँकेची तपासणी केली होती. त्यानंतर बँकेच्या कामकाजामध्ये आढळलेल्या गंभीर बाबींसंदर्भात पूर्तता करण्याबाबत निर्देश दिले होते. परंतु बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने त्या निर्देशांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने ५ लाख रुपये दंड ठोठावला. नाबार्डचे नियम डावलून संचालक मंडळाने ‘आदित्य नेचरफे्रश प्रॉडक्ट’ या खासगी कंपनीस सवलतीच्या दराने कर्ज दिले. यामुळे बँकेचे ३ लाख २७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चौकशी अधिकारी शिवाजी पहिणकर यांनी ७७ संचालकांवर १० आरोप ठेवले आहेत. या आरोपांसंदर्भात २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे.