शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

आजचा सरपंच भविष्यातील मुख्यमंत्री; ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 3:18 AM

२८ मार्च रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रंगलेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रमुख राजकारण्यांच्या हस्ते १३ सरपंचांचा गौरव करण्यात आला. या वेळी राजकारण्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, याबद्दलचा हा खास वृत्तान्त..!

कोटींची उड्डाणे घेऊ पाहणाऱ्या भारतातील ७२ टक्के लोकसंख्या आजही खेड्यात राहते. त्यामुळे खेडी ही देशाचा कणा आहेत. याच खेड्यांना एकसंध राखण्याचे काम करतात ते त्या-त्या गावचे सरपंच. नव्या दमाच्या सरपंचांनी शासनाच्या नव्या योजना आणि धोरणांच्या मदतीने आपल्या गावांचा कायापालट केलेला आपण पाहतो. ‘लोकमत’ने अशाच काही सरपंचांचे कार्यकर्तृत्व समाजासमोर मांडून, प्रेरित करण्याच्या उद्देशाने ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’च्या माध्यमातून त्यांचा गौरव केला. २८ मार्च रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रंगलेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रमुख राजकारण्यांच्या हस्ते १३ सरपंचांचा गौरव करण्यात आला. या वेळी राजकारण्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, याबद्दलचा हा खास वृत्तान्त..!सोहळ्यातील ‘हशा’ आणि ‘टाळ्या’!सरपंच अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात प्रेक्षकांच्या टाळ्यांची दादमिळवणारे आणि प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडणारे अनेक किस्से घडले. त्यातील काही मोजक्या किश्शांबाबत...मकरंद अनासपुरेंचा खळखळाटआपल्या विशेष गावरान शैलीने प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपल्या भाषणातून श्रोत्यांच्या डोळ्यांत अंजन घातले. संत एकनाथ महाराजांचा किस्सा, गांधीगिरी आंदोलन, गावपातळीवरील निवडणुका, व्यसनमुक्ती, सोशल मीडियाचा गैरवापर अशा विविध गंभीर मुद्द्यांवर मकरंदने विनोदी शैलीतच प्रकाश टाकला. तसेच गैरप्रवृत्तींचा खरपूससमाचारही घेतला.‘जाता जाता चांगले काम करा’पंकजा ताई म्हणतात, जाता-जाता चांगले काम करा!, मंत्री अर्जुन खोतकर यांच्या या वाक्याने सभागृहात एकच हशा पिकला. त्यांच्या एका शब्दात राजकारण, तर दुसºयात समाजकारण दडल्याचे खोतकर म्हणाले.तटकरेंना कोपरखळी!तटकरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, सरपंच होणे त्यांच्या नशिबी आले नाही. त्यामुळे सरपंचाचे दु:ख काय असते, त्यांना कळणार नाही, अशा शब्दांत दानवे-पाटील यांनी मारलेल्या कोपरखळीने श्रोत्यांच्या हसू फुटले.भाऊ - कुशलची जुगलबंदी!महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांनी ‘काळू-बाळूच्या तमाशा’तील एक प्रसंग सादर करत सभागृहाला लोटपोट हसवले. सोहळ्याला ‘चार चाँद लावणाºया’ त्यांचा अभिनयाने छायाचित्रकारापासून ते कॅमेरामन आणि पुरस्कारप्राप्त सरपंच या सर्वांना भुरळ घातली....हे तर आपले बाप आहेत!गावच्या सरपंचांना पुस्तके शिकायची गरज नाही. कारण तो चेहरा पाहून माणसे ओळखतो. म्हणूनच बाजारात गेल्यावर चांगला बैल कसा ओळखायचा म्हटले, तर सरपंच त्याचे दात पाहतो. म्हैस घ्यायला गेला, तर म्हशीची कास पाहतो; आणि बोकड घ्यायला गेला, तर पाय उचलून पाहतो. त्यामुळे परीक्षेबाबत हे आपले बाप आहेत. दानवे यांच्या या तुफान फटकेबाजीवर लोटपोट होऊन सभागृह हसत होते.प्रत्येक गाव, प्रत्येक सरपंच महत्त्वाचा - विजय दर्डा‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा या वेळी म्हणाले, ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ हा ‘लोकमत परिवारा’साठी अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार सोहळा आहे. हे राष्ट्र जर महान बनवायचे असेल, तर प्रत्येक गाव आणि त्या गावातील सरपंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही आवर्जून उल्लेख केला. बाभूळगावचे सरपंच ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास होता. पण त्यांनी सरपंच पदाचा नेहमी अभिमान बाळगला.भाजपाने बोलायचे, आम्ही ऐकायचे - सुनील तटकरेसुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटलांची फिरकी घेतली. ते म्हणाले, भाजपाने बोलायचे, आम्ही ऐकायचे. आम्ही बोलायचे, तुम्ही काम करायचे. ते पुढे म्हणाले, ‘लोकमत’चा हा उपक्रम स्तुत्य आहे. खेड्यातील माणूस शहरांकडे येत असतानाच, ग्रामीण भागाला ताकद देण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. शरद पवार यांनी महिलांना राजकारणात स्थान दिल्याची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली.सरपंचपदाची सर मंत्रीपदाला नाही - रावसाहेब दानवे-पाटीलरावसाहेब दानवे-पाटील यांनी आपल्या भाषणात ‘लोकमत समूहा’चे आभार मानले. सरपंचांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही मारत, त्यांचे दु:खही विशद केले. ते म्हणाले, सरपंच ही देशाच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाची व्यक्ती आहे. या वेळी त्यांनी आपल्या सरपंचपदाच्या आठवणींनाही उजाळा दिला. मी केंद्रात मंत्री जरी झालो असलो तरी सरपंचपदी असताना जे काम केलं त्याची सर त्या मंत्रीपदाला नाही, असं ते म्हणाले.ही तर यशवंतरावांची दूरदृष्टी - राजेंद्र दर्डा‘लोकमत’चे एडिटर-इन-चिफ राजेंद्र दर्डा म्हणाले, आजच्या कार्यक्रमात ज्या सरपंचांना गौरविण्यात आले; ते भविष्यातील मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राने पंचायत राज सर्वांत आधी स्वीकारले. यशवंतरावांची दूरदृष्टी यामागे होती, असेही त्यांनी नमूद केले. ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’करिता १८ जिल्ह्यांतून प्रस्ताव आले आहेत, यासाठी खास तज्ज्ञांचे पॅनल कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीसोबतच स्मार्ट गावेही करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.प्रत्येक योजनेत लोकसहभाग महत्त्वाचा - पंकजा मुंडेग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात बाबांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ या कार्यक्रमाला आल्यानंतर बाबांना भेटायला येत असलेले सरपंच आठवले. पहिली ग्रामविकास महिला मंत्री झाल्याचा आनंदही त्यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच विजेत्या सरपंचाला २५ लाखांची घोषणा या कार्यक्रमात करतानाच, कोणत्याही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.सरपंचांनी संधीचे सोने करावे - पांडुरंग फुंडकरकृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, आम्ही अनेक जिल्ह्यांत कृषी महोत्सव घेतले. सरपंचांचा गौरव केला. १३ तालुक्यांतील सरपंचांना रोख मदत केली. विदर्भात गाडगेबाबा, तुकडोजी महाराज होऊन गेले. आम्ही त्या दोघांच्या स्वप्नातील गावे उभारत आहोत. यासाठी ग्रामस्थांचा पाठींबाही महत्त्वाचा आहे. ‘लोकमत’ केवळ वर्तमानपत्र चालवत नाही, तर समाजासाठीही ते झटत असते, असे म्हणत सरपंचांनी संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले.अनेकांना विकासकामे रोखण्यात धन्यता वाटते - अर्जुन खोतकरमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, सरपंच पदावर काम करणे खूप कठीण आहे. त्यांच्यासमोर खूप अडचणी असतात. कामे करण्यापेक्षा कामे रोखण्यात लोक धन्यता मानतात. सरपंचांनी गावातील सामाजिक, राजकीय माहिती ठेवावी. ‘लोकमत’ सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. खेड्यांना अजून स्वातंत्र्य मिळालेले नाही. गावांची घडी इंग्रजांनी विस्कटली. त्यांनी घालून दिलेली व्यवस्था आज पुन्हा बदलण्याची गरज आहे.सरपंच गावाचा, देशाचा कणा - जयकुमार रावलमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, सरपंच गावाचा, देशाचा कणा आहे. त्यांच्यावर जबाबदारी वाढली आहे. पूर्वी कामे हळूहळू व्हायची. आता कामे झपाट्याने होत आहेत. ग्रामीण पर्यटनाला अर्थव्यवस्थेत महत्त्व आले आहे. आपल्याकडील गावांना वारसा असल्याने तेथे पर्यटनाला वाव आहे, असेही ते म्हणाले. तुम्ही जर निसर्गरम्य वातावरण उभारले, तर आम्ही पर्यटनासाठीच्या संधी उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले.खरा भारत गावांमध्ये वसतो - राजीव पोद्दारबीकेटी लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार या वेळी म्हणाले, ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’मध्ये सहभागी असल्याचा बीकेटी टायर्सला सार्थ अभिमान वाटतो. भारताचे हृदय, अर्थात खरा भारत गावांमध्ये वसतो आहे; आणि आपल्या ग्रामस्थांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सातत्याने नि:स्वार्थपणे झटणाºया नेत्यांशी आम्हाला जोडून देण्याचे काम या व्यासपीठाच्या माध्यमातून झाले आहे.सरपंच हा गावाचा बाप असला पाहिजे - मकरंद अनासपुरेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी या उपक्रमाबद्दल ‘लोकमत’चे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, सरपंच हे दोन प्रकारचे असतात. एक सरपंच पर्सेंटवाला आणि दुसरा सरपंच बिना पर्सेंटवाला. जो बिना पर्सेंटवाला सरपंच या सभागृहात बसला असेल त्यालाच माझं बोलणं समजू शकेल. कोणताही सरपंच हा त्या गावचा बाप असला पाहिजे. गावातल्या प्रत्येक गोष्टींची जबाबदारी एका बापाप्रमाणे सरपंचाने उचलायला हवी.पुरस्काराच्या माध्यमातून काम करण्यास नवी ऊर्जा मिळते - रवींद्र शहाणेमहिंद्रा कृषी विभागाचे उपाध्यक्ष (विपणन) रवींद्र शहाणे या वेळी म्हणाले, ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड २०१७’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अशा पुरस्कारांमुळे गावांचा कायापालट होऊन ग्रामीण भारताचा उत्कर्ष होण्यास चालना मिळेल. महाराष्टÑ हा महिंद्रा ट्रॅक्टरची महत्त्वाची बाजारपेठ असून येथे आमच्या अर्जुन, नोवो, युवो आणि जिओ या उत्पादनांना भरपूर लोकप्रियता लाभली आहे.

काळानुरूप समस्याही बदलताहेत - पोपटराव पवारहिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार म्हणाले, या पुरस्काराचे ज्युरी म्हणून काम करत असतानाच मला अनेक गावांना भेटी देता आल्या. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव भौगोलिकरीत्या वेगळे आहे. ज्यांची आम्ही निवड केली, त्या प्रत्येकामध्ये आपल्या गावाला समृद्ध करण्याची जिद्द आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीने श्रमदान करून आपल्या गावाला होईल ती मदत करण्याची गरज आहे. कारण काळ बदलतोय त्याप्रमाणे समस्याही बदलत आहेत.

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्