शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूचा ‘आर’ हद्दपार; पंधरा मित्रांचा निर्धार

By admin | Updated: March 23, 2015 00:35 IST

साताऱ्यातील दिशादर्शक संकल्प : आबांच्या जाण्यानं सोडलं तंबाखूचं व्यसन-- गुड न्यूज

सागर गुजर - सातारा -आपल्या लोभस स्वभावाने संपूर्ण राज्यभरातल्या जनतेच्या मनात घर केलेल्या आर. आर. पाटील यांच्या आकस्मिक मृत्युमुळे अनेकांची मने हेलावली आहेत. उमेदीच्या वयात आबांसारख्या थोर नेत्याला इहलोक सोडावा लागला, याची सल सर्वांनाच आहे. पण, ही सल अनेकांच्या जखमेचे कारण ठरलेय. त्यांच्या मृत्यूनंतर तंबाखूला हातही लावायचा नाही, असा वज्रनिर्धार साताऱ्यातल्या तरुणांनी केलाय. अनेक वर्षांपासूनच्या आपल्या व्यसनालाही त्यांनी हद्दपार केलेय!एका थोर नेत्याच्या आकस्मिक जाण्यानं उद्विग्न झालेल्या साताऱ्यातील अनेक तरुणांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेलं तंबाखू खाण्याचं व्यसन हद्दपार केलं. मनाची तयारी केल्यानंतर कुठलंच व्यसन सोडणं जड नसल्याचं सत्य यानिमित्तानं पुढं आलंय. ‘गेली १६ वर्षे तंबाखूचं व्यसन मला चिकटून होतं. कधी घरातल्यांशी लपवून तर मित्रांमध्ये जाहीरपणे या पद्धतीनं हे व्यसन सुरू होतं. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील गेले आणि मन थाऱ्यावर आले. तंबाखू खायचीच नाही, हा दृढनिश्चय केला आणि मी आता तंबाखूमुक्त व आनंदी जीवन जगत आहे,’ तंबाखूमुक्त झालेले अंबादास तांबे ‘लोकमत’ला सांगत होते. तंबाखू खाल्ल्याशिवाय जमत नाही, असं म्हणणारी मंडळी आपण आजूबाजूला पाहतो. शेतकरी वर्गात तर याचं मोठं व्यसन आहे. कामाला सुरुवात करण्यापूर्वी तोंडात तंबाखूचा आर टाकल्याशिवाय कामच पूर्ण होत नाही, असा तंबाखूचे व्यसन असणाऱ्या अनेकांचा भ्रम आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. आबा गेल्यानंतर आपल्या मनातलं शल्य प्रसारमाध्यमांपुढे जाहीरपणे बोलून दाखविलं होतं. ‘कर्तृत्वाचा महामेरू असणाऱ्या आबांनी पक्षाला एका उंचीवर नेऊन पोहोचवलं; पण आबांना आपण वारंवार बोललो; पण त्यांनी ऐकलं नाहीे,’ असं दु:खावेगात ते बोलून गेले होते. ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देणारे आणि तंटामुक्त अभियानाच्या माध्यामातून भाऊबंदकीला हद्दपार करण्याची मनीषा बाळगणारे आर. आर. पाटील नुकतेच निवर्तले. आर. आर. आबांना तोंडाचा कर्करोग झाला होता. आबांच्याकडून अनेक गोष्टी घेण्यासारख्या होत्या. त्यांचे लोभस व्यक्तिमत्त्व, साधेपणा या त्यांच्या गुणांमुळे ते तरुणांचे ‘हिरो’ ठरले होते. मात्र, या हिरोला अकाली जावं लागल्यानं त्याचा धक्काच अनेकांना बसला आहे. साताऱ्यातल्या तरुणांनी तंबाखू सोडण्याचा केलेला दृढनिश्चय अनेकांसाठी दिशादर्शक असा ठरणार आहे. तंबाखूचं व्यसन अत्यंत वाईट आहे. उपचाराअंती मद्यपानाचं व्यसन एकवेळ सुटू शकेल; पण तंबाखूचं व्यसन सुटणं कठीण! तंबाखू सोडण्यासाठी मनाचा दृढनिश्चय असणं गरजेचं आहे. मनाचा तोल सावरला तर तंबाखूच काय कुठलंही व्यसन आपण हद्दपार करू शकतो. परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वयक उदय चव्हाण यांची भेट घेऊन या व्यसनाबाबत चर्चा केली. त्यांनीही या निश्चयाचे कौतुक करून पाठीवर हात टाकला. आता मी पूर्णपणे तंबाखूमुक्त झालो आहे.- गुरुदत्त शेजवळ, व्यावसायिक, सातारातंबाखू सोडण्यासाठी काय करता येईल?तंबाखू सोडणारच, ही मनाची तयारीतंबाखू सोडण्यासाठी निर्णयानंतरचे पाच दिवस महत्त्वाचे या दिवसांत मन चांगल्या गोष्टींत गुंतवावंएकटं राहून वाचन करावं- मनाची ताकद वाढेल, असं काहीही केलं तरी उत्तमविकारांवर ताबा मिळविण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न...तंबाखू सोडल्यानंतरचे ‘ते’ पाच दिवस!पहिला दिवस : तंबाखू खाण्याची तीव्र इच्छा होतेदुसरा दिवस : मन चंचल होतं, तंबाखूची पुडी घेण्यासाठी पाय दुकानाकडे वळताततिसरा दिवस : हा दिवस खूप महत्त्वाचा, मनात चलबिचल सुरू होते. हा दिवस पार केला तर अर्धी लढाई जिंकलो म्हणून समजाचौथा दिवस : तंबाखू खावी की नको अशी द्विधा मन:स्थितीपाचवा दिवस : या दिवशी तंबाखू खाल्ली नाही की व्यसन सुटले म्हणजे समजातंबाखूचं व्यसन अत्यंत वाईट आहे. उपचाराअंती मद्यपानाचं व्यसन एकवेळ सुटू शकेल; पण तंबाखूचं व्यसन सुटणं कठीण! तंबाखू सोडण्यासाठी मनाचा दृढनिश्चय असणं गरजेचं आहे. मनाचा तोल सावरला तर तंबाखूच काय कुठलंही व्यसन आपण हद्दपार करू शकतो. परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वयक उदय चव्हाण यांची भेट घेऊन या व्यसनाबाबत चर्चा केली. त्यांनीही या निश्चयाचे कौतुक करून पाठीवर हात टाकला. आता मी पूर्णपणे तंबाखूमुक्त झालो आहे.- गुरुदत्त शेजवळ, व्यावसायिक, सातारा