शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

वेळ नदीला पूर

By admin | Updated: August 19, 2014 23:00 IST

गेल्या आठवडाभरापासून विश्रंती घेतलेल्या पावसाने मंगळावारी जिल्ह्यातील काही भागांत दमदार हजेरी लावली.

गेल्या आठवडाभरापासून विश्रंती घेतलेल्या पावसाने मंगळावारी जिल्ह्यातील काही भागांत दमदार हजेरी लावली. खेड, आंबेगाव तालुक्यांत काही भागात पाणीच पाणी असा चित्र निर्माण झाले होते. सातगाव पठार भागात वेळ नदीला पूर आला होता. तर पुरंदरवर रूसलेल्या पावसाने येथे 13.7 मि.मी.ची नोंद केली. पावसाने जिल्ह्यात एकीकडे असे चित्र असले तरी इंदापूरकरांवर शेतीला टँकरने पाणी देत असल्याचे विदारक चित्र आहे.
 
पेठ :  सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज दुपारी तीननंतर पावसाने अचानक दमदार हजेरी लावली. वेळ नदीला पूर येऊन पुराचे पाणी पेठ येथील गावातून जाणा:या पुणो-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर  असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून या वेळ नदीचे पाणी बराच वेळ वाहत होते. कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव व पेठ परिसरात हा पाऊस पडला. काही प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. गेले सात ते आठ दिवस पावसाने विश्रंती घेतली होती. शेतक:यांची बटाटा लागवड नुकतीच संपली आहे. शेतकरी थोडा तरी पाऊस पडावा ही अपेक्षा बाळगून होते. ती अपेक्षा आजच्या पावसाने पूर्ण केल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सातगाव पठार भागात खरीप हंगामातील बटाटा पिकाच्या खुरपणीचे काम चालू आहे. मात्र दुपारनंतर अचानक पावसामुळे हे काम बंद झाले असून, या पावसाने शेतात पाणी साठून राहणार असल्याने खुरपणीची कामे खोळंबणार असल्याची शक्यता शेतक:यांनी वर्तविली. 
चाकण/ कडूस : खेड तालुक्यात चाकणकरांना अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी 5 वाजता धो धो पाऊस सुरु  झाला अन् सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले . पुणो- नाशिक महामार्गावरून पावसाचे पाणी वाहत होते. येथील कोहिनूर सेंटर मधील तळघरातील आवारात पाणी घुसले होते. त्यामुळे दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली . 
कडूस परिसरातील ओढे-नाले पाण्याने भरून वाहत होते. अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे दोंदे येथील ओढय़ावरील पुलावरून पावसाचे पुराचे पाणी आल्यामुळे दोंदे येथील लक्ष्मण रोकडे (वय 52) वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोंदे, कडूस, रानमळा आदी भागांत एक तास  हजेरी लावली. 
कडूस रस्त्यावरील ओढय़ावर पुराचे पाणी आल्यामुळे राजगुरुनगरकडून कडूसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी सहानंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (वार्ताहर)
 
वाहतूक ठप्प : दोंदे येथील सुकाळेवस्ती येथील ओढय़ावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे कडूस गावाकडे जाणारी वाहतूक जवळपास तीन तास  खोळंबली होती.
 
पुरंदर  तालुक्यात 13.7 मिमी. 
 
सासवड : सासवडसह पुरंदरमध्ये दुपारी 1 ते 2 दरम्यान 13.7 मिमी. पाऊस पडला आहे. अजून दोन दिवस असे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 
जून महिन्यापासून आतार्पयत 254.7 मिमी. पाऊस झाला असून, ऑगस्टच्या अखेरीस जून व जुलै महिन्याची सरासरी गाठली आहे.  जून ते ऑगस्टअखेर्पयत 35क् मिमी.र्पयतची पावसाची सरासरी आहे. वाटाणा, कांदा व पालेभाज्याचे बी महागाईचे घेऊन शेतात पेरणी केली ते उगवण्यासाठी पावसाची आवश्यकता होती. 
 
4गेल्या 15 दिवसांपासून 
पावसाने ओढ दिल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. बाजरी, वाटाणा, कांदा व पालेभाज्या ही पिके पाऊस वेळेवर न पडल्याने घेता आली नाहीत. खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामात पुरेसा पाऊस झाला, तर शेतकरी  ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, वाटाणा  व पालेभाज्या ही पिके घेता येतील.