शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:20 IST2025-09-27T19:19:27+5:302025-09-27T19:20:01+5:30
"या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे."

शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
राज्यातील शेतकऱ्यांचं मराठवाडा, विदर्भ, उत्तर मराहाष्ट्र आणि जेथे-जेथे नुकसान झाले, ते मोठे नुकसान आहे. मराठवाड्यात खूप जास्त नुकसान झाले आहे. या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
शेतकऱ्याच्या बांदावर जाऊन पाहणी केली, नुकसान मोठे -
शिंदे म्हणाले, "मराठवाडा, विदर्भ, उत्तर मराहाष्ट्र आणि जेथे-जेथे नुकसान झाले, ते मोठे नुकसान आहे. मराठवाड्यात खूप जास्त नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री स्वतः, मी स्वतः अजित दादा आणि आमच्या सर्वमंत्र्यांनी जेथे जेथे नुकसान झाले, तेथे शेतकऱ्याच्या बांदावर जाऊन पाहणी केली आहे. डोळ्याने बघितले आहे. नुकसान मोठे आहे. संकट मोठे आहे. अशा परिस्थितीत बळीराज्याच्या पाठीशी राहण्याचे काम सरकार करेल. बळीराजाच्या आणि आमच्या आया-भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहेत. ते पुसण्याचे काम सरकारचे आहे. त्यामुळे यासंदर्भात सकार पूर्णपणे गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण यासंदर्भात शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय नक्की घेऊ. यावेळी अटी-शर्थी शिथील कराव्या लागतील. काही बाजूला ठेवाव्या लागतील. सरकार शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहण्याचे काम नक्की करेल."
शिंदे पुढे म्हणाले, "जेव्हा गृहमंत्री अमित शाह मुंबीत आले होते, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही दोघांनीही त्यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली. जेव्हा जेव्हा मोठे संकट आले तेव्हा तेव्हा केंद्र सरकारने हात पुढे केला आहे. कालही मुख्यमंत्री स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत. त्यांनाही निवेदन दिले आहे. मागणी केली आहे. राज्य तर हात आखडता घेणार नाहीच, पण केंद्रातील मोदी सरकारही नेहमी शेतऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत यावेळीही उभे राहतील."
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका -
"या संकटाच्या परिस्थितीत कुठलेही राजकारण न आणता, सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे. शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे. आपण सध्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देत आहोत. त्यात, घराची झालेली पडझड, ते दुरुस्ती करण्यासाठी आपण त्यांना पैसे देत आहोत, पशूधन वाहून गेले त्यासाठी मदत करत आहोत. शेतीचे नुकसान झालेय, त्याचा आपण पंचनामा करत आहोत, जी शेती वाहून गेली आहे, त्याला आपण पैसे देत आहोत आणि जीवीत हाणी झालीय त्यालाही पैसे देत आहोत. या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे," असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
पीकविम्यासंदर्भात राज्य सरकारने बदललेल्या निकशांसंदर्भात बोलताना, 'ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल, ते माध्यम सरकार अलंबेल, एवढं मी आपल्याला सांगतो, असा विश्वासही यावेळ शिंदे यांनी दिला.