शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: August 25, 2014 01:09 IST

घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना वर्धा तालुक्यातील रोठा येथे रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या

एकाला अटक : गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडलेवर्धा : घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना वर्धा तालुक्यातील रोठा येथे रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. सदर युवकाला सेवाग्राम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याचे नाव आशिष सातपुते (१९) रा. सुरगाव (रेहकी) असे असल्याचे पोलिसांनी सांगितलेपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोठा येथील सतीश शंकर वादे यांची तीन वर्षांची मुलगी घरासमोर अंगणात खेळत होती. यावेळी गावात आलेल्या सुरगाव (रेहकी) येथील आशिष सातपूते याने त्यांच्या मित्राची दुचाकी घेवून तुझा काका कुठे आहे दाखव असे म्हणत सदर चिमुकलीला दुचाकीवर बसविले. एक अनोळखी युवक गावातील मुलीला गाडीवर नेत असताना एका युवतीला दिसला. तिने लगेच ही माहिती सदर मुलीच्या कुटुंबीयांना व गावातील काही युवकांना दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी व सदर मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरू केले. यात काही युवक दुचाकीने सदर युवक ज्या दिशेने गेला त्या दिशेने निघाले. यात सदर युवक त्यांना धोत्रा (रेल्वे) येथे दिसला. त्याला पकडून गावात आणून चांगलाच चोप दिला. सोबत त्याच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. त्यांना सेवाग्राम ठाण्यात आणण्यात आले असून यातील आशिषवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.(प्रतिनिधी)