तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

By Admin | Updated: August 25, 2014 01:09 IST2014-08-25T01:09:12+5:302014-08-25T01:09:12+5:30

घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना वर्धा तालुक्यातील रोठा येथे रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या

Three year old daughter kidnapping attempt | तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

एकाला अटक : गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले
वर्धा : घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना वर्धा तालुक्यातील रोठा येथे रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. सदर युवकाला सेवाग्राम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याचे नाव आशिष सातपुते (१९) रा. सुरगाव (रेहकी) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोठा येथील सतीश शंकर वादे यांची तीन वर्षांची मुलगी घरासमोर अंगणात खेळत होती. यावेळी गावात आलेल्या सुरगाव (रेहकी) येथील आशिष सातपूते याने त्यांच्या मित्राची दुचाकी घेवून तुझा काका कुठे आहे दाखव असे म्हणत सदर चिमुकलीला दुचाकीवर बसविले. एक अनोळखी युवक गावातील मुलीला गाडीवर नेत असताना एका युवतीला दिसला. तिने लगेच ही माहिती सदर मुलीच्या कुटुंबीयांना व गावातील काही युवकांना दिली.
माहिती मिळताच गावकऱ्यांनी व सदर मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरू केले. यात काही युवक दुचाकीने सदर युवक ज्या दिशेने गेला त्या दिशेने निघाले. यात सदर युवक त्यांना धोत्रा (रेल्वे) येथे दिसला. त्याला पकडून गावात आणून चांगलाच चोप दिला. सोबत त्याच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. त्यांना सेवाग्राम ठाण्यात आणण्यात आले असून यातील आशिषवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.(प्रतिनिधी)

Web Title: Three year old daughter kidnapping attempt