शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तीन महिला बेपत्ता

By admin | Updated: December 2, 2014 02:48 IST

येथील मंगला इंगळे यांच्यासह तीन महिला दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन महिला तीन दिवसांपासून परतल्याच नाहीत.

पिंपरी : येथील मंगला इंगळे यांच्यासह तीन महिला दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन महिला तीन दिवसांपासून परतल्याच नाहीत.हिंजवडी फेज दोनजवळील ओझरकरवाडीतील पॉवर हाऊस, गवारेवस्ती येथून शुक्रवारी दुपारी या महिला बेपत्ता झाल्या आहेत. या महिलांचे अपहरण झाले आहे का, याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्रतिभा प्रकाश हजारे (२५, रा. ओझरकरवाडी, मूळ नवलिहाळ, जि. बेळगाव), मंगला सिद्धार्थ इंगळे (२६, रा. ओझरकरवाडी, मूळ वाशीम), विद्या दशरथ खाडे (२४, रा. ओझरकरवाडी, मूळ सातारा) अशी बेपत्ता महिलांची नावे आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. पी. भोसले यांनी सांगितले.प्रतिभा या डीएलएफ कंपनीत तर विद्या खाडे या इन्फोसिसमध्ये सुरक्षारक्षक आहेत. मंगला गृहिणी आहेत. या सर्व महिला गवारेवस्तीत शेजारी राहतात. शुक्रवारी विद्या खाडे यांच्या पोटात दुखू लागल्याने प्रतिभा आणि मंगला त्यांना हिंजवडी येथील दवाखान्यामध्ये घेऊन गेल्या.प्रतिभा यांची आठ वर्षांची मुलगी घरीच होती. त्यांचे पती प्रकाश कामावरून घरी आले असता, त्यांना प्रतिभा घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी मुलीकडे चौकशी केली. मुलीने विद्या खाडे यांच्या पोटात दुखू लागल्याने आई तिला घेऊन दवाखान्यात गेली आहे, असे सांगितले. सायंकाळी पाचच्या सुमारास खाडे यांच्या मोबाईलवरून मंगला यांनी पती सिद्धार्थ यांना फोन केला. लवकर या, लवकर या असे त्या म्हणत होत्या. त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन बंद झाला. सिद्धार्थ व प्रकाश यांनी विद्या आणि प्रतिभा यांच्या मोबाईलवर फोन लावला; परंतु त्यांचा मोबाईल बंद आहे. (प्रतिनिधी)