शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तिघींचा महिलेवर हातोड्याने हल्ला

By admin | Updated: September 24, 2014 05:28 IST

चार महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून ३ महिलांनी ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात हातोडा घातल्याची धक्कादायक घटना सोमवारी घाटकोपरमध्ये घडली

मुंबई : चार महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून ३ महिलांनी ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात हातोडा घातल्याची धक्कादायक घटना सोमवारी घाटकोपरमध्ये घडली. या हल्ल्यामध्ये अनुसया शर्मा ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी तीन हल्लेखोर महिलांंच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांंचा शोध सुरू केला आहे.घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरमधील प्रियदर्शिनी संक्रमण शिबिरामध्ये अनुसया पतीसोबत राहते. चार महिन्यांपूर्वी अनुसयाचा याच परिसरात राहणाऱ्या अमिना, असरफ झा आणि परवीन सोरटिया या तिघींशी वाद झाला होता. याच रागातून सोमवारी सायंकाळी भांडण उकरून काढत या तिघींनी अनुसयावर हल्ला चढविला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच तिघींनीही सोबत आणलेला हातोडा अनुसयाच्या डोक्यात घातला. डोक्यात जबर मार लागल्याने रक्तबंबाळ झालेली अनुसया बेशुद्ध होऊन कोसळली. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पंतनगर पोलिसांनी अनुसयाला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलेने दिलेल्या जबाबावरून तिन्ही महिलांविरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल करीत पंतनगर पोलिसांनी त्यांंचा शोध सुरू केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)