शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांच्या बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट पकडले !

By admin | Updated: June 22, 2015 04:15 IST

वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या गडावर एक हजार व पाचशेच्या बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट मंदिर प्रशासन व गावकऱ्यांच्या खबरदारीमुळे

नाशिक : वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या गडावर एक हजार व पाचशेच्या बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट मंदिर प्रशासन व गावकऱ्यांच्या खबरदारीमुळे उघड झाले. नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कुटुंबातील लहान मुले व महिलांसह १४ संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन लाख पंचवीस हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत. रविवारी सकाळी टाटा-४०७, दोन मॅक्स-जीप, एक बोलेरो व स्कार्पिओ या वाहनांमधून जामखेड (जि. अहमदनगर), बीड, सोलापूर जिल्ह्यातील काही कुटुंबे सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी आले होते. संबंधित महिला गडावरील दुकानातुन पूजेचे साहित्य, प्रसाद, खाद्य पदार्थ, मुलांची खेळणी खरेदी करीत होते. एक हजाराची नोट देऊन हे संशयित केवळ पन्नास ते शंभर रूपयांचीच खरेदी करत होते. मिळालेले सुटे पैसे बाजूला ठेवून, पुन्हा हजाराची नोट देत वस्तू खरेदी करण्याचा त्यांचा सपाटा सुरूच होता. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पिंटू बत्तासे यांना हजाराची नोट देऊन त्यांच्या दुकानातून काहींनी खरेदी केली. बत्तासे यांना संशय आल्याने त्यांनी मंदिर विश्वस्तांच्या देणगी कार्यालयातील मशिनमध्ये हजाराची नोट तपासली असता ती बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, संदीप बेनके-पाटील यांनी परिसरातील दुकानदार व गावकऱ्यांना सावध करत संशयितांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. (वार्ताहर)