बस-मिनीडोअर अपघातात तीन ठार

By Admin | Updated: May 31, 2014 23:41 IST2014-05-31T23:41:53+5:302014-05-31T23:41:53+5:30

दोंडाईचा -शहादा रस्त्यावर एसटी बस-मिनीडोअर यांच्यात झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले असून एक महिला गंभीर जखमी आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने बस जाळण्याचा प्रयत्न केला.

Three killed in bus accident | बस-मिनीडोअर अपघातात तीन ठार

बस-मिनीडोअर अपघातात तीन ठार

संतप्त जमावाने बस पेटविली

दोंडाईचा (जि. धुळे): दोंडाईचा -शहादा रस्त्यावर एसटी बस-मिनीडोअर यांच्यात झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले असून एक महिला गंभीर जखमी आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने बस जाळण्याचा प्रयत्न केला. शहादा-दोंडाईचा रस्त्यावर आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एसटी बस (क्र. एम.एच.१४ बीटी २१०९) व मिनीडोअर (क्र. एम.एच. १८-१२४९) यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यात मिनिडोअरचा चालक हितेंद्र इंद्रसिंग जाधव (४२ रा.पथारे ) याच्यासह बालू गोरख गिरासे ( ५० रा.पथारे) व भूरा बापू पवार (५२ रा.रामी) हे तीनजण जागीच ठार झाले. तर भूरा पवार यांच्या पत्नी विमलबाई पवार गंभीर जखमी झाल्या. त्यांना धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने बस पेटवून दिली. त्यात बस ४० टक्के जळाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढविण्यात आला. रात्रीही एक तुकडी घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली.

Web Title: Three killed in bus accident