शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विसर्जन मिरवणुकीत हजारांवर हँडसेट लंपास : १६ चोरट्यांकडून शंभरहून अधिक मोबाईल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 8:22 PM

गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजाराहून अधिक घटना घडल्या. या चोऱ्या प्रामुख्याने लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते विजय टॉकीज चौक दरम्यान करण्यात आल्या.

ठळक मुद्देमालेगावातील टोळीकडून ७५ मोबाईल जप्तचार प्रमुख मार्गांवर मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकेविसर्जन मिरवणुकीत अल्पवयीन मुलांचा मोबाईल चोरीसाठी वापर आतापर्यंत एकूण ९ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजाराहून अधिक घटना घडल्या असून गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मोबाईल चोरीसाठी खास मालेगावहून दोन गाड्या करुन आलेल्या टोळीतील ९ जणांना ताब्यात घेतले आहे़. त्यांच्याकडून आतापर्यंत ७५ हँडसेट हस्तगत केले आहे़. डेक्कन पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २७ मोबाईल जप्त केले आहेत़. याशिवाय विश्रामबाग, फरासखाना पोलिसांनी प्रत्येकी दोघांना ताब्यात घेतले आहे़. विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड या चार प्रमुख मार्गांवर मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके ठेवली होती़. तसेच साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरु होती़. असे असताना चोरट्यांच्या टोळ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोबाईल लंपास केले़. या चोऱ्या प्रामुख्याने लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते विजय टॉकीज चौक दरम्यान घडल्या़ तसेच बेलबाग चौक ते मंडई दरम्यानही मोबाईल, पाकीट लांबविण्याच्या घटना अधिक होत्या़. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडूशेठ गणपती व हुजुरपागा येथे मालेगावहून आलेल्या चोरट्यांना पकडले़ हे पथक गस्त घालत असताना त्यांनी दोघा जणांना मोबाईल चोरताना पकडले़. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले़. आतापर्यंत एकूण ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ७५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे़. त्यांच्या आणखी साथीदारांना पकडण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे़. डेक्कन पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २७ मोबाईल जप्त केले आहेत़. सुरज सुभाष कोल (वय २३, रा़ शहाजपूर, मध्य प्रदेश), चपाटी शाम दीपक (वय १९, रा़ बबीना, झाशी, उत्तर प्रदेश) आणि अरुण प्रकाश कोल (वय २१, रा़ शहाजपूर, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस़ के़ सोनावणे व त्यांच्या सहकाऱ्यांना झेड ब्रीजजवळ मोबाईल चोरटे थांबले असल्याची माहिती मिळाली़. त्यावरुन त्यांनी तिघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून २७ मोबाईल जप्त केले आहेत़. याशिवाय फरासखाना व विश्रामबाग पोलिसांनी दोन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे तपास करण्यात येत आहे़. ................अल्पवयीन मुलांचा वापरविसर्जन मिरवणुकीत अल्पवयीन मुलांचा मोबाईल चोरीसाठी वापर करण्यात आल्याचे दिसून आले़. मुख्य मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीला गेले़. सायंकाळनंतर भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले़. त्यांचे दर्शन घेण्यासाठी लक्ष्मी रोडवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़. त्याचा गैरफायदा घेऊन घोळक्याने चोरटे मोबाईल, पाकीटे चोरत असल्याचे आढळून आले़ .हे गणपती पुढे गेल्यानंतर विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाणे व मंडई पोलीस चौकी येथे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती़. पोलिसांनी त्यांना शहर पोलीस दलाच्या वेबसाईटवर लॉस्ट अँड फाऊंड या ठिकाणी तक्रार देण्यास सांगितले़. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत आतापर्यंत किती मोबाईल चोरीला गेले याची अजून नोंद पूर्ण झाली नाही़. हजारांहून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली़. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनPoliceपोलिसMobileमोबाइलtheftचोरीMalegaonमालेगांव