Join us  

अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले

विराट आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, परंतु त्याच्या स्ट्राईक रेटवरून त्याच्यावर टीका होतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 8:52 PM

Open in App

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी आज RCB चा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यावर जोरदार टीका  केली. विराट आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, परंतु त्याच्या स्ट्राईक रेटवरून त्याच्यावर टीका होतेय. त्यावर गावस्करांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती आणि विराटनेही त्यांना उत्तर दिले. विराटच्या या बोलण्याचा गावस्करांनी आज समाचार घेतला. कोहलीने आयपीएल २०२४ मध्ये ५०० धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व ४ अर्धशतकांचा समावेश आहे.  

गेल्या आठवड्यात, कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध ४४ चेंडूत ७० धावांची सामना जिंकणारी खेळी खेळल्यानंतर त्याच्या स्ट्राइक-रेटवर झालेल्या टीकेला उत्तर दिले. “जे लोक स्ट्राइक रेटबद्दल बोलतात आणि मी स्पिन चांगला खेळत नाही ते सर्व लोक या गोष्टीबद्दल बोलत आहेत. माझ्यासाठी संघाला विजय मिळवून देणे महत्त्वाचे आहे आणि मी १५ वर्ष हेच करत आलो आहे, हे यामागचे एक कारण आहे.  तुम्ही तुमच्या संघांसाठी सामने जिंकले आहेत. मला फारशी खात्री नाही, की जर तुम्ही स्वतः त्या परिस्थितीत नसाल तर बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोला,” असे कोहलीने सांगितले होते.

"स्ट्राइक रेट ११८ असतानाच समालोचकांनी प्रश्न केला. मला खात्री नाही. मी जास्त सामने पाहत नाही, त्यामुळे इतर समालोचकांनी अन्यथा काय म्हटले आहे हे मला माहीत नाही. पण जर तुमचा स्ट्राइक ११८ असेल आणि मग तुम्ही ११८ च्या स्ट्राइक-रेटसह १४व्या किंवा १५व्या षटकात बाद होत असाल, तर ते चुकीचे आहे.  तुम्हाला त्याबद्दल टाळ्या हव्या असतील तर ते थोडे वेगळे आहे, " असे आरसीबी विरुद्ध GT यांच्यातील सामन्यापूर्वी गावस्कर म्हणाले.

गावसकर यांनी पुढे कोहलीला विचारले की, जर तुम्ही त्याकडे लक्ष देत नसल्याचा दावा करत असाल तर तो बाहेरच्या आवाजाला का प्रतिसाद देत आहे. "तुम्ही जेव्हा या सगळ्यांना सांगता की मी बाहेरच्या आवाजाची पर्वा करत नाही, अहो. मग तुम्ही बाहेरच्या आवाजाला का उत्तर देताय. आम्ही सगळे थोडे क्रिकेट खेळलो आहोत. आम्ही जे काही पाहतो त्याबद्दल आम्ही बोलतो.   

टॅग्स :आयपीएल २०२४सुनील गावसकरविराट कोहली