शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 5:43 PM

अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना मी जूनमध्ये खासदार करणार असल्याची घोषणा केली आहे.

Satara Lok Sabha ( Marathi News ) :सातारा लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात चुरशीची लढत होत आहे. उदयनराज भोसले यांच्या प्रचारासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना मी जूनमध्ये खासदार करणार असल्याची घोषणा केली आहे. "यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला वाई-महाबळेश्वर-खंडाळा या भागातून एक लाखांचं मताधिक्य द्या, जूनमध्ये मी नितीन पाटील यांना खासदार करतो. त्यांना खासदार नाही केलं तर मी पवारांच्या औलाद सांगणार नाही," असं अजित पवार म्हणाले.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याने पक्षाला भरभरून प्रेम दिलं आहे. मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातून आपला निष्ठावंत शिलेदार शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी ही जागा महायुतीच्या जागावाटपात भाजपला दिली आहे. भाजपकडून या जागेवर राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. याच उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज अजित पवार यांनी सभा घेतली.

प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, "राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या जिल्ह्यात तुम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा खासदार निवडून देत आहात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळं बटण दाबताना तुमच्या मनात वेगळी भावना येईल. पण तुम्ही काही चिंता करू नका. आता तुम्ही चांगलं मतदान करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. जूनमध्ये मी नितीन पाटील यांना राज्यसभेचा खासदार करतो. साताऱ्यात दोन खासदार झाल्यानंतर तुमची कामं व्हायला मदत होईल," अशी साद अजित पवारांनी सातारकरांना घातली.

साताऱ्यात आज दोन दिग्गज नेत्यांच्या सभा

सातारा लोकसभेसाठी आज सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  तालीम संघ मैदानावर सभा होत आहे. महायुती उमेदवार व खासदार उदयनराजेंसाठी ही सभा असणार आहे. तर सायंकाळी ६ च्या सुमारास साताऱ्यातीलच जिल्हा परिषद मैदानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. दोन्हीही सभा एकाचवेळी होणार असल्याने दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारsatara-pcसाताराmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४