गारमेंट उद्योगातील हजारो कोटींची उलाढाल ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 05:50 AM2020-09-20T05:50:11+5:302020-09-20T05:50:36+5:30

कोरोनाचा फटका । राज्य सरकारच्या योजना कागदावरच

Thousands of crores of turnover in the garment industry stalled | गारमेंट उद्योगातील हजारो कोटींची उलाढाल ठप्प

गारमेंट उद्योगातील हजारो कोटींची उलाढाल ठप्प

googlenewsNext

बाळकृष्ण दोड्डी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : कोरोनाचा जसा जबरदस्त फटका यंत्रमाग उद्योगाला बसला आहे; तसेच राज्यभरातील गारमेंट उद्योगही या महामारीमुळे अडचणीत आले आहेत. दरवर्षी सुमारे सात हजार कोटींची उलाढाल गारमेंट उद्योगात होते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे पाच हजार कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली.


महाराष्ट्रात जवळपास ९० हजारांहून अधिक गारमेंट्स युनिट्स आहेत. एकूण उलाढालीत ७० टक्के उलाढालही फक्त स्कूल युनिफॉर्ममधून होते. जूननंतर शाळा सुरू न झाल्याने युनिफॉर्मचा सिझन संपुष्टात आला आहे. त्यामुळे गारमेंट क्षेत्राशी संबंधित जवळपास पंधरा ते सोळा लाख कामगारांच्या हाताला काम मिळाले नाही.
अनलॉक झाल्यानंतर एक ते दोन महिन्यांत गारमेंट उद्योग पूर्वपदावर येईल, अशी आशा गारमेंट उद्योजकांना होती; मात्र गारमेंट उत्पादनांना देशाच्या बाजारपेठेतून केवळ पंधरा ते वीस टक्केच मागणी आहे. त्यामुळे आशेवर पाणी पडले आहे. एकूण उलाढालीत निर्यातीचा वाटा जवळपास २५ ते ३० टक्के इतका आहे. उर्वरित ७० टक्के देशांतर्गत बाजारपेठ आहे.


मागील पाच ते दहा वर्षांत गारमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात फोफावतोय, विशेषकरून महाराष्ट्रात पुणे, मुंबई, भिवंडी, कल्याण, सोलापूर, इचलकरंजी, कोल्हापूर, नाशिक, नागपूर तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांत गारमेंट उद्योगाचे जाळे विणले आहे. परंतु कोरोनामुळे कोंडी झाली आहे.


प्रत्यक्षात उद्योजकांना लाभ नाहीच
कोरोनाकाळात सरकारकडून भरपूर अपेक्षा आहेत. ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्या कागदोपत्री दिसत आहेत. प्रत्यक्षात लाभ उद्योजकांना होत नाही. अशा अडचणीच्या काळात ‘ईएसआय’ योजनेंतर्गत हजारो कोटींचा निधी शिल्लक आहे. यातून उद्योजकांना अर्थसाहाय्य मिळणे गरजेचे आहे. लाखो कामगारांची अवस्था बिकट असून त्यांनाही मदत मिळाली पाहिजे.
- संतोष कटारिया,
सहसचिव : क्लोथिंग मॅन्युफॅक्चर आॅफ असोसिएशन इंडिया, पुणे


आकडे बोलतात
राज्यात एकूण गारमेंट युनिट्स : ९० हजार
एकूण कामगार : १५ लाख
एकूण वार्षिक उलाढाल : ५ हजार कोटी
स्कूल युनिफॉर्म उलाढाल : साडेतीन हजार कोटी

Web Title: Thousands of crores of turnover in the garment industry stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.