शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते - नीलम गोऱ्हे

By admin | Updated: October 7, 2016 19:38 IST

कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींवर तातडीने आरोपपत्र दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींच्या सर्व चाचण्या

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 07 -  कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींवर तातडीने आरोपपत्र दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींच्या सर्व चाचण्या व अहवाल येण्यास वेळ लागला. त्यामुळे आरोपींवर आरोपपत्र दाखल होण्यास उशीर झाला असला तरी सरकार याबाबत गंभीर आहे. या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी सांगलीत व्यक्त केला.विधानपरिषद विशेषाधिकार समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आ. गोऱ्हे सांगली दौऱ्यावर होत्या. या समितीच्या कामकाजाची माहिती त्या पत्रकारांना देत असतानाच कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाल्याचे वृत्त धडकल्याने त्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली.गोऱ्हे म्हणाल्या की, पोलिस महासंचालकांच्या अहवालानुसार पंधरा दिवसात आरोपींवर दोषारोप दाखल होणे अपेक्षित होते मात्र, डीएनए चाचणीसह अन्य अहवाल येण्यास उशीर झाल्याने दोषारोपपत्रास विलंब झाला असला तरी सरकार या घटनेबाबत गंभीर असल्याने आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या खटल्याचे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्या म्हणाल्या की, विद्यमान सरकारच्या कालावधीत गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी केवळ सहा टक्क्यांवर असलेले हे प्रमाण आता ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सांगली आणि मुंबईमध्ये तर शिक्षेचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने कायद्याचे राज्य स्थापित करण्यात सरकार यशस्वी झाले आहे.शिवसेना भेकड नाहीदसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागून मराठा समाजाचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला, हा विरोधकांचा आरोप चुकीचा असून उलट ठाकरे यांनी ददिलगिरी व्यक्त केल्याने जनतेसमोर आपण नम्र आहोत, हेच दिसून आले आहे. विरोधकांच्या आरोपांमुळे दसरा मेळाव्याला बाधा पोहचणार नसून असे हजारो मेळावे शिवसेना घेतच राहील. विरोधकांच्या आरोपांना घाबरण्याएवढी शिवसेना भेकड नाही, असे आ. गोऱ्हे म्हणाल्या.