शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वाळीत टाकल्याप्रकरणी तीस जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: November 21, 2014 02:33 IST

मुंबईतील खोली गावकीच्या नावावर करण्यासाठी दबाव आणून वृद्ध दाम्पत्याला वाळीत टाकण्याचा प्रकार महाड तालुक्यात उघडकीस आला.

महाड : मुंबईतील खोली गावकीच्या नावावर करण्यासाठी दबाव आणून वृद्ध दाम्पत्याला वाळीत टाकण्याचा प्रकार महाड तालुक्यात उघडकीस आला. तालुक्यातील खैरांडेवाडी (तेलंगे) या गावातील शिवराम वनगुले यांना वाळीत टाकल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तेलंगे खैरांडेवाडी येथील शिवराम महादेव वनगुले यांच्या मालकीची मुुंबईत दादरच्या दादासाहेब फाळके मार्गावर शिवनेरी इमारतीत खोली आहे. गिरणी बंद पडल्याने रोजगार संपलेल्या वनगले हे गावाकडे राहावयास आले होते. त्या काळात बंद असलेली खोली मुंबईत नोकरी करणाऱ्या गावकऱ्यांना राहण्यासाठी देण्याची विनंती केली होती. वनगले यांनी गावकऱ्यांची ही विनंती मान्य करून त्यांना ती राहण्यास दिली. २००९मध्ये यापैकी काही गावकऱ्यांनी ग्रामस्थ मंडळ नोंदणीकृत करायचे आहे, असे सांगून एका स्टॅम्प पेपरवर वनगुले यांची सही घेतली. मात्र सदरची खोली ग्रामस्थ मंडळाच्या नावावर करण्याचा त्या गावकऱ्यांचा हेतू नंतर वनगुले यांच्या लक्षात आला. त्या वेळी माझी खोली मला परत करा, असे त्यांनी सांगितले. तेव्हा तुम्ही ही खोली मंडळाच्या नावावर करण्यास नाहरकत प्रमाणपत्र दाखवले आणि त्यासाठी आणखी सह्या करा यासाठी गावकऱ्यांनी शिवराम वनगुले यांच्यावर दबाव आणला. तसेच खोली गावकीच्या मंडळाच्या नावावर करण्यास नकार देणाऱ्या वनगुले यांना गावकीने १ लाख रुपयांचा दंड ठोठावून त्या कुटुंबाला वाळीत टाकले. (प्रतिनिधी)