शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत उष्माघाताचा तिसरा बळी

By admin | Updated: May 29, 2015 01:23 IST

जिल्ह्णात उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेला असून, गुरुवारी उष्माघाताने आणखी एकाचा बळी गेला. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्णात उष्माघाताने तिघांचे बळी गेले आहेत़

उस्मानाबाद : जिल्ह्णात उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेला असून, गुरुवारी उष्माघाताने आणखी एकाचा बळी गेला. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्णात उष्माघाताने तिघांचे बळी गेले आहेत़ मेडसिंगा येथील पंडित दगडू कदम (७५) हे गुरूवारी सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी उस्मानाबाद येथे आले होते़ भाजी खरेदी केल्यानंतर ते गावाकडे जाण्यासाठी देशपांडे स्थानकावर गेले असता अचानक चक्कर येऊन पडले़ त्यांना उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात दाखल केले़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले़ भूम शहरातील प्रकाश उर्फ पोकाश अजितो चालोक (२२) हा सराफा दुकानात दागिने तयार करण्याचे काम करतो़ प्रकाश बुधवारी दुपारी जेवणासाठी जात होता़ तीव्र उन्हात चालत जाताना त्याला अचानक चक्कर आल्याने तो खाली पडला़ त्याला रूग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले़ दरम्यान, रखरखत्या उन्हात उस्मानाबाद शिवारात झाडे तोडण्याचे काम करणाऱ्या भागवत सिध्दराम क्षीरसागर (६५) यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला़ वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य होत आहे. (प्रतिनिधी)