शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

..तर टाळता आली असती प्रवाशांची गैरसोय!

By admin | Updated: July 22, 2015 22:55 IST

रखडलेला ब्रॉडगेज प्रकल्प; अकोला-इंदूर ब्रॉडगेज टाळू शकला असता रेल्वेचे नुकसान.

अतुल जयस्वाल/अकोला : दक्षिण- उत्तर आणि पूर्व-पश्‍चिम भारताला रेल्वेने जोडण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मध्य प्रदेशातील इटारसी येथील रुट रिले इंटरलॉकिंग (आर.आर.आय.) यंत्रणेच्या कक्षाला गत महिन्यात आग लागल्यामुळे संपूर्ण यंत्रणाच कोलमडली व या मार्गावरून धावणार्‍या शेकडो रेल्वेफेर्‍या रेल्वे प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर झालीच, रेल्वेचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडाला. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला ते इंदूर हा लोहमार्ग अत्यंत उपयुक्त ठरला असता. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर पूर्ण झालेले असते, तर प्रवाशांची गैरसोय व महसुलाचे नुकसान, या दोन्ही गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या. दक्षिण-उत्तर आणि पूर्व-पश्‍चिम भारताला रेल्वेमार्गाने जोडणारा चतुष्कोन पश्‍चिम-मध्य रेल्वेच्या इटारसी स्थानकावर आहे. मुंबई-भोपाळ, भोपाळ-नागपूर आणि मुंबई-जबलपूर-अलाहबाद या लोहमार्गावर धावणार्‍या गाड्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे स्टेशन आहे. गत महिन्यात १७ जून रोजी या स्टेशनच्या इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे देशभरातील रेल्वे सेवा विस्कळित झाली. दक्षिण भारतातून उत्तरेकडे जाणार्‍या रेल्वे गाड्या नागपूर-इटारसी-जबलपूर मार्गे जातात. इटारसी येथील यंत्रणा कोलमडल्यामुळे या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. या परिस्थितीत मध्य भारतातील अत्यंत महत्त्वाचे स्टेशन असलेले अकोला स्टेशन हा महत्त्वाचा दुवा ठरू शकला असता. रतलाम- इंदूर-खंडवा-अकोला-पूर्णा या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी अकोला ते पूर्णा हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज झाला. तसेच रतलाम ते इंदूरपर्यंंत ब्रॉडगेजचे काम झालेले आहे. या मार्गावरील मधला भाग, खंडवा ते अकोलापर्यंंत ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम गत अनेक वर्षांंपासून रखडलेले आहे. अकोला ते इंदूर हा लोहमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित झालेला असता, तर दक्षिण भारतातून येणार्‍या गाड्या वर्धा येथून अकोला व तेथून खंडवा-इंदूर मार्गे उत्तर भारताकडे वळविता येऊ शकल्या असत्या. तसेच मुंबईकडून येणार्‍या गाड्याही भुसावळमार्गे खंडवा व तेथून इंदूर मार्गे उत्तर भारताकडे वळविता आल्या असत्या. इटारसी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून जाणार्‍या मार्गासाठी अकोला-इंदूर-रतलाम हा एक पर्याय रेल्वेकडे उपलब्ध झाला असता; परंतु या मार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे दक्षिण भारताकडून नागपूर मार्गे उत्तरेकडे जाणार्‍या शेकडो गाड्या नाईलाजाने रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय तर झालीच, याशिवाय रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा फटकाही बसला.

*गेज परिवर्तनाचे काम प्राधान्याने करण्याची गरज

         भौगोलिकदृष्ट्या अकोला हे शहर भारताच्या मध्यभागात येते. मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्टेशन असलेल्या अकोल्यातून मुंबई-कोलकाता हा लोहमार्ग जातो. तसेच पूर्णा ते महू हा रेल्वेमार्गही शहरातून जातो. महाराष्ट्राला मध्य व उत्तर भारताशी जोडणारा अत्यंत कमी अंतराचा असलेला हा लोहमार्ग ब्रिटिशांच्या काळात बांधून पूर्ण झाला होता. व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाचे अकोला ते पूर्णापर्यंंतचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले; परंतु अकोला ते खंडवा व तेथून पुढे इंदूर या मार्गाचे गेज परिवर्तन मात्र गत अनेक वर्षांंपासून रखडलेले आहे. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास दक्षिणेकडून येणार्‍या गाड्या अकोला मार्गे थेट मध्यप्रदेशात जाऊ शकतात. त्यामुळे या मार्गाचे तातडीने ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे.