शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपासून पगारच नाही

By admin | Updated: July 18, 2015 02:14 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी संघातील सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. परिणामी चार दिवसांत पगार दिला नाही, तर २१ जुलैपासून कर्मचारी काम बंद

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी संघातील सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. परिणामी चार दिवसांत पगार दिला नाही, तर २१ जुलैपासून कर्मचारी काम बंद करून बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य सहकारी सेवक कृती संघटनेने दिला आहे.संघटनेने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की गेल्या ९७ वर्षांपासून राज्यातील सहकारी संस्था आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांना सहकाराचे प्रशिक्षण देण्याचे काम संघ करीत आहे. पूर्वी १०० टक्के अनुदान मिळणाऱ्या या संस्थेचे अनुदान शासनाने काही वर्षांपूर्वी बंद केले. तरीही शिक्षण निधीच्या जोरावर संघाचे काम सुरू होते. एकट्या मुंबईतून शिक्षण निधीतून संघ सव्वा कोटी रुपये महसूल गोळा करीत होता. तर राज्यातून शिक्षण निधीच्या माध्यमातून ६ कोटी रुपये गोळा होत होते. मात्र २०१३ साली शासनाने नियमांत बदल करीत सहकारी शिक्षण व प्रशिक्षण बंधनकारक केले. शिक्षण निधीऐवजी शिक्षण प्रशिक्षण निधीची तरतूद केली. मात्र सरकारने या संस्थेसोबतच अन्य सहा संस्थांना अधिसूचित केले. शिवाय प्रशिक्षणाचे दरही ठरवण्यात आले नाही. त्यामुळे संघाला मिळणारा उत्पन्नाचा मार्गच बंद झाल्याचे संघाचे म्हणणे आहे. परिणामी जानेवारी २०१५ पासून येथील कर्मचाऱ्यांना पगारच मिळाला नसल्याचे संघटनेने सांगितले.सहकार आणि वस्त्रोद्योग विभागाने १०० टक्के अनुदान देत कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्याची मागणी संघटनेने केली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगानुसार तरी पूर्ण पगार द्यावा, अशी मागणी केली आहे अन्यथा २१ जुलैपासून संघटनेचे कर्मचारी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करतील. (प्रतिनिधी)संघटनेचा आरोपएकीकडे अधिसूचित केलेल्या संस्थांना अनुदान मिळत असताना महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला मात्र अनुदानापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. नव्या नियमांत शिक्षण व प्रशिक्षण बंधनकारक ठेवण्यात आले नाही.