शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

सात तारखा देऊनही निकाल नाहीच!

By admin | Updated: September 25, 2014 04:55 IST

जावेद, सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि अत्याचार केला, असे जाधव यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सुनावणी संपली असून निकालासाठी सात वेळा तारखा देऊनही अद्याप निकाल देण्यात अलेला नाही.

जितेंद्र कालेकर, ठाणेगृहरक्षक दलाचे विशेष पोलीस महासंचालक अहमद जावेद आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांच्यासह सहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल देण्यात विलंब होत असल्याबद्दल विशेष न्यायाधीश एम. ए. लोवेकर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवृत्त पोलीस अधिकारी बबन जाधव यांनी केली आहे. जावेद, सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि अत्याचार केला, असे जाधव यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सुनावणी संपली असून निकालासाठी सात वेळा तारखा देऊनही अद्याप निकाल देण्यात अलेला नाही. निवृत्त पोलीस अधिकारी बबन जाधव यांनी जावेद आणि सिंग यांच्यासह विशेष पोलीस महासंचालक एस.पी. गुप्ता, निवृत्त पोलीस उपायुक्त विश्वास साळवे, गृह विभागाचे तत्कालीन कक्ष अधिकारी पी. एम. वानखेडे आणि एसीपी विलास शिंदे या अधिकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याची सुनावणी २ जुलै २०१४ रोजीच संपली. निकालासाठी १६ जुलै ही तारीख देऊनही निकाल दिला नाही. त्यानंतर तब्बल सहा तारखा देऊनही निकाल मात्र दिलाच नाही. ज्येष्ठ नागरिक असूनही जाधव हे या सर्व तारखांना कधी ठाणे तर कधी सांगलीहून न्यायालयात येत होते. सुनावणी संपल्यानंतर क्रिमिनल प्रोसिजरनुसार १५ दिवसांत निकाल देणे अपेक्षित आहे. तरीही, कोणतेही कारण न देता निकालास विलंब झाल्यामुळे हा प्रकार संशयास्पद आल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. निकाल देण्यास न्या. लोवेकर विलंब करत असल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या दक्षता विभागाचे निबंधक बी.पी. पाटील यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.