शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

भूकंप प्रतिरोधक इमारतींचा रेकॉर्ड नाही!

By admin | Updated: May 2, 2015 10:25 IST

नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाने मुंबईसाठीही धोक्याची घंटा वाजवली आहे़ मात्र भविष्यात असा भूकंप झाल्यास त्यापुढे तग धरू शकणाऱ्या

मुंबई : नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाने मुंबईसाठीही धोक्याची घंटा वाजवली आहे़ मात्र भविष्यात असा भूकंप झाल्यास त्यापुढे तग धरू शकणाऱ्या इमारतींची नोंद पालिकेकडे नाही़ त्यामुळे मुंबई व आसपासच्या शहरातील भूकंप प्रतिरोधक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे़गेल्या आठवड्यात नेपाळ तसेच उत्तर भारतातील काही शहरांना भूकंपाचा धक्का बसला़ या नैसर्गिक आपत्तीत हजारो लोकांचे बळी गेले़ अशा भूकंपाचा धोका मुंबई, नाशिक, पुणे या शहरांनाही असल्याच्या अफवा पसरू लागल्या आहेत़ तूर्तास असा कोणताही धोका मुंबईसाठी वर्तविण्यात आलेला नाही़ मात्र भूकंप प्रतिरोधक इमारतींची यादी असणे आपत्तीकाळात शहरासाठी दिलासादायी ठरू शकते़ संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारीसाठी ही माहिती एकत्रित केली जाणार आहे़ यासाठी सर्व सरकारी व खाजगी प्राधिकरणांना अशा इमारतींची यादी सादर करण्याचे आवाहन पालिका करणार आहे़ किती रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे किती व कोणत्या इमारती तग धरू शकतात, याची यादी उपलब्ध असल्यास या इमारतींचा वापर आपत्तीकाळात निवाऱ्यासाठी होऊ शकेल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)