शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रक्त विलगीकरण सुविधा नाही

By admin | Updated: June 14, 2014 23:44 IST

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ब्लड कॉम्पोनन्ट सेपरेशनची म्हणजेच रक्त विलगीकरणाची सुविधा अद्यापही मिळाली नाही.

बुलडाणा : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ब्लड कॉम्पोनन्ट सेपरेशनची म्हणजेच रक्त विलगीकरणाची सुविधा अद्यापही मिळाली नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडून गत तीन वर्षापासून ही सुविधा मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे; मात्र मागणी अद्यापही प्रलंबित आहे.

रक्तात पांढर्‍या पेशी कमी झाल्या की, त्याचे निदान करता येत नाही. त्यामुळे अश्या रुग्णाला तत्काळ रक्त उपलब्ध होत नाही. ताप आणि इतर आजारात रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. बर्‍यावेळी उपचाराअभावी रुग्णांना मृत्यूही होतो. बर्‍याच आजारामध्ये जास्त ताप आल्यास यात पांढर्‍या पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढते; मात्र रक्तात पांढर्‍या पेशी कमी झाल्या की नाही, याचे निदान करण्यासाठी उपयुक्त ब्लड कॉम्पोनन्ट सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचार मिळू शकत नाही. अश्या रुग्णांना रक्त पेढय़ातून रक्त देण्याची सुविधा आहे. पांढर्‍या पेशी कमी झाल्यानंतर रक्तात असलेल्या घटकांना वेगवेगळे करणे आवश्यक असते. त्यातून जो घटक कमी झाला. तेवढय़ाच घटकाचे रक्त रुग्णाला देण्याची आवश्यकता असते; मात्र बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतरही काही रुग्णालयात अशी मशिनरी अद्यापही उपलब्ध नसल्याने डॉक्टर योग्य निदान लावू शकत नाही. रक्त विलगीकरणाची सुविधा अकोला, जळगाव, औरंगाबाद, वाशिम येथील मोठय़ा रुग्णांलयात उपलब्ध आहे. या ठिकाणी रुग्णांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक लूट होते. अश्यावेळी बर्‍याच रुग्णांना बुलडाणा जिल्ह्यातील रक्तपेढय़ातून रक्त मिळू शकत नाही. जिल्हय़ात ही सुविधा नसल्याने पांढर्‍या पेशी कमी झालेल्या रुग्णांना इतरत्र ठिकाणी सोयीनुसार जावे लागते. शासनाच्या नियमानुसार रक्तदात्याच्या शरीरातून काढलेले रक्त जसेच्या तसेच दुसर्‍याला देणे हा गुन्हा आहे. त्यासाठी रक्तातील घटक वेगवेगळे करणे आवश्यक असते; मात्र तशी व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने बहुतांश रक्तपेढय़ातून पूर्ण रक्तच दिले जाते. अगदी शासकीय रक्तपेढय़ातूनही असेच काम चालते. रक्तातील घटक वेगळे करण्याची व्यवस्था सध्या बुलडाणा जिल्ह्यात केवळ खामगावात आहे. या ठिकाणी रक्तातील प्लाझ्मा, प्लेटलेट्स व पॅकेट सेल हे घटक वेगवेगळे केले जातात. पैकी प्लाझा हे जळालेल्या व लिव्हर फेलीवर रुग्णासाठी, प्लेटलेटस निमोनिया, डेंगूच्या रुग्णासाठी तर पॅकेट सेल हे अँनेमियाच्या वृध्द रुग्णांसाठी वापरले जाते. तशी व्यवस्था जिल्ह्यातील इतरही रक्तपेढय़ामध्ये करण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या रक्तपेढयांमध्ये बुलडाणा शहरात दोन रक्तपेढय़ा, याशिवाय मलकापूर मध्ये १, शेगावमध्ये २, खामगाव १ रक्तपेढय़ा आहेत. चिखली आणि मेहकर मध्ये रक्तसंकलन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे; मात्र बर्‍याच वेळा या रक्तांचा उपयोग जिल्ह्यातील लोकांना कमी प्रमाणात होतो. जालना, औरंगाबाद आणि वाशिम, अकोला जिल्ह्यातील मोठय़ा रुग्णालयाकडून हे रक्त मागविल्या जाते. यामुळे स्थानिक रुग्णांना आवश्यकता पडल्यावर रक्त मिळत नसल्याच्या घटना घडल्या आहेत.